नाशिकच्या गंगापूर धरणात बुडून चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शहरानजीक असलेल्या गायकवाड गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याचा अंदाज न आल्याने तीन चुलत भाऊ व एका आतेबहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेत एक मुलगी वाचली असून,तिच्यावर उपचार सुरू आहेत.
ही हृदयद्रावक घटना गुरूवारी दुपारी ४ वाजता गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात चैतन्य फार्म येथे घडली. निखिल मच्छिंद्र गोतरणे (वय १६, सर्व जण रा. सावरगाव, ता. जि. नाशिक), गणेश सुरेश गोतरणे (१६), साहिल मनोहर गोतरणे (१७), आतेबहीण मयुरी पवन जाधव (वय २१, रा. त्र्यंबकेश्वर)मयुरी जाधव निखिल गोतरणे
गणेश गोतरणे साहिल गोतरणे अशी मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत.

रूपाली रामदास धनगर (वय १७, रा. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असे बचावलेल्या मुलीचे नाव आहे. मृत तिघे चुलत भाऊ असून,ते एकुलते एक आहेत. विवाहिता ही मृत तिघांची आतेबहीण आहे. कायम बरोबर फिरणारे व सुख दुःखात कायम एकत्र राहणारे तिघे चुलत भाऊ काळाने हिरावल्याने सावरगावमध्ये शोककळा पसरली आहे. चौघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी मुलांच्या नातलग व नागरिकांनी गर्दी केली होती.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!