श्रीरामपूर प्रतिनिधी ख्रिस्ती कुटुंबातल्या मुलामुलींच्या विवाह विषयक समस्या अगदी सोप्या पद्धतीने सोडविण्याच्या उदात्त हेतूने सामाजिक उपक्रमांतर्गत संगमनेरच्या भोसले प्रतिष्ठनाच्या वतीने रविवार ७ जून रोजी दुपारी १२ वाजता ख्रिस्ती विवाहेच्छुकांची संपर्क सभा आयोजित केलेली आहे.
हा कार्यक्रम आगाशे सभागृह (टिळक वाचनालय),ममता स्वीट्स समोर मेनरोड, श्रीरामपूर या ठिकाणी पार पडणार आहे.सर्व प्रकारच्या लग्न करू इच्छिणाऱ्या मुलामुलींचा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे संपर्क करून देणे,त्यांना समोरा समोर बसून बोलून निर्णय घेण्याची संधी उपलब्ध करून देणे अशा काही महत्वाच्या उद्देशाने या संपर्क सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अशा सेवाभावी उपक्रमात पालकांनी आपल्या इच्छुक मुलामुलींना प्रत्यक्ष घेऊन यावे व आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ७०८३९२२०५२ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
