झरेकाठी सोमनाथ डोळे गेल्या काही दिवसांपासून राजकीयदृष्ट्या शांत दिसणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.खासदार डाॅ.सुजय विखे पाटील पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत दिसू लागले आहेत.
राहता तालुक्यातील लोणी येथील भाषणात नाव न घेता सुजय विखे पाटलांनी चौफेर फटाकेबाजी करत म्हटले की नवीन पोरं सत्ता घेऊन फिरतायत,मर्यादा पाळा' लोणीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भाजपचे युवा नेते आणि आमदार विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला.
त्यांच्या या वक्तव्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची चर्चा सुरू झाली आहे.विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर विवेक कोल्हे यांनी कोपरगाव आणि शिर्डी परिसरात आपली राजकीय सक्रियता वाढवली आहे.
याच पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांकडे थेट राजकीय इशारा म्हणून पाहिले जात आहे.आगामी काळात दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहेत.त्यामुळे विखे पाटील सुजय विखे पाटील आणि कोल्हे गटातील राजकीय संघर्षाच्या ठिणग्या आणखी उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे."
