पुण्यातील ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार महेंद्र वाघमारेंच्या स्वयंभू चित्राचे प्रदर्शन उद्घाटन

Cityline Media
0
पुणे प्रशांत निकम पुण्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार महेंद्र साहेबराव वाघमारे यांच्या चित्र शिल्प कलाकृतींचे स्वयंभू या शिर्षाचे दुसरे एकल चित्र शिल्प प्रदर्शन पुण्यात ७ जून  ते ९ जून  पर्यंत पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे सकाळी साडे अकरा ते रात्री साडेसात वाजेपर्यंत विनामूल्य आयोजित करण्यात आले आहे.
या स्वयंभू एकल चित्र शिल्पाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कोहिनूर ग्रुपचे व खडकी शिक्षण संस्थेचे कृष्णकुमार गोयल, पुणे महानगरपालिकेचे मा. उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, पुणे महानगरपालिकेच्या मा.नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे, पुणे महानगरपालिकेचे मा. उपमहापौर प्रकाश मंत्री  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार महेंद्र वाघमारे,श्रीजीत वाघमारे,कुशल वाघमारे उपस्थित होते. या प्रदर्शनास प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी,प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, ज्येष्ठ व प्रसिद्ध कवी  म.भा.चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली.

या प्रदर्शनास रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर भेट देणार आहेत.या प्रदर्शनास चित्र व शिल्प प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. हे प्रदर्शन सात जून २६ ते ९ जून २६ या दरम्यान सकाळी साडेअकरा ते साडेसात वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहेत तरी या प्रदर्शनास अवश्य पुणेकर नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!