ए.पी.व्हिजन फिल्म सादर करित आहे या वर्षातील सर्वात रोमँटिक सिनेमॅटिक गीत

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव मराठी प्रेक्षकांसाठी आणि रसिक प्रेक्षकांसाठी पसंतीत उतरणारे  'एन.पी.व्हिजन  ‌फिल्म लवकरच आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला एक भव्य, रोमँटिक आणि थेट मनाला स्पर्श करणारे एक अप्रतिम सिनेमॅटिक गीत घेऊन येत आहे.
नुकतेच या गाण्याचे शूटिंग निसर्गरम्य आणि अत्यंत सुंदर ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेम,भावना, सुंदर स्वप्नं आणि आजच्या तरुण पिढीचा सळसळता उत्साह एका वेगळ्याच आणि भव्य स्वरूपात अनुभवायला मिळणार आहे.

या बहुप्रतीक्षित गाण्याचे निर्माते आबा निर्मळ आणि दिग्दर्शक प्रमोद निर्मळ यांनी पुन्हा एकदा एक आगळावेगळा विषय,दमदार सादरीकरण आणि उच्च दर्जाचा सिनेमॅटिक लुक प्रेक्षकांसमोर आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. "हे गाणं प्रत्येक तरुणाच्या हृदयाला थेट स्पर्श करेल आणि प्रेक्षक ते एकदा पाहून तृप्त होणार नाहीत, तर पुन्हा पुन्हा पाहतील," असा ठाम विश्वास निर्माते आणि दिग्दर्शकांनी संयुक्तपणे व्यक्त केला आहे.

या गाण्याची सर्वात मोठी आणि मुख्य खासियत म्हणजे यामध्ये पाहायला मिळणारी नव्या दमाची फ्रेश रोमँटिक जोडी होय.यश भालेराव आणि समीक्षा कराळे हे दोघेही आपले उच्च शिक्षण घेत असताना,अभ्यासाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या गाण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.

यश हा संगणक अभियंता असून समीक्षा देखील अभियांत्रिकी शिक्षणाची पूर्वतयारी करत आहे. आपल्या उच्च शिक्षणासोबतच अभिनयाची आवड अत्यंत जिव्हाळ्याने जपत या दोघांनी पडद्यावर एक ताजीतवानी,सळसळती आणि थेट मनाला भिडणारी हृदयस्पर्शी केमिस्ट्री साकारली आहे, जी प्रेक्षकांसाठी नक्कीच एक सुखद धक्का ठरणार आहे.

सर्व बाजूंचा विचार केल्यास,या गाण्याचे अमोघ आणि हृदयस्पर्शी शब्द निर्माते आबा निर्मळ यांनी लिहिले आहेत.तसेच कॅमेऱ्यामागची अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची धुरा अजय निर्मळ यांनी सांभाळली असून,गाण्याला अधिक आकर्षक व दर्जेदार सिनेमॅटिक रूप देण्याचे महत्त्वाचे एडिटिंगचे काम दिग्दर्शक प्रमोद निर्मळ यांनी स्वतःकेले आहे.

या संपूर्ण प्रोजेक्टच्या मीडिया प्रमोशनची आणि प्रसिद्धीची महत्त्वाची जबाबदारी सुमित कराळे यांनी चोखपणे सांभाळली आहे.
एन पी. व्हिजन' ही निर्मिती संस्था केवळ गाणी किंवा चित्रपट बनवण्यापुरती मर्यादित नाही,तर नवोदित आणि तरुण कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देऊन त्यांच्यातील सुप्त ज्ञान  जगासमोर आणण्याचे काम सातत्याने करत आहे.आबा निर्मळ आणि प्रमोद निर्मळ यांची ही जोडी कलाक्षेत्रात येवू इच्छिणाऱ्या अनेक नवोदित कलाकारांसाठी खरोखरच आशेचा एक नवा किरण ठरत आहे.

आता सर्व प्रेक्षकांना फक्त प्रतीक्षा आहे त्या खास दिवसाची,जेव्हा हे भव्य रोमँटिक सिनेमॅटिक  गीत एन पी व्हिजन फिल्मच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होईल आणि सर्वांना प्रेमाच्या एका नव्या, सुखद प्रवासात घेऊन जाईल. तर मग रसिकहो, तुम्हीही तयार राहा, कारण प्रेमाची ही नितांत सुंदर आणि सुरेल कहाणी येत्या रविवारी ५ तारखेला तुमच्या भेटीला येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!