झरेकाठी सोमनाथ डोळे राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील आजचा हा कार्यक्रम माझ्या कायम लक्षात राहणारा असून या विद्यालयातील एक वर्ष जीवनातील खूप काही शिकून गेले .या विद्यालयाची माजी विद्यार्थ्यांची परंपरा आणि योगदान खूप मोठे असून मी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यालयाची माजी विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले .
राहता तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या विद्यार्थी प्रित्यर्थ नुकतेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या विद्यालयाचे १९५५-५६ या वर्षातील माजी विद्यार्थी देशाचे नेते खासदार शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सभापती व मंत्री दिलीप वळसे पाटील हे होते.
यावेळी सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील अभिवादन स्थळाचे नूतनीकरण आणि दहावी १९८३ च्या बॅच कडून मिळालेल्या सहा लाख रुपये किमतीच्या सायकल स्टॅन्डचे उद्घाटन शरद पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी विद्यार्थी वस्तीगृह इमारत ,कनिष्ठ महाविद्यालय इमारत आणि पद्मविभूषण शरद पवार सभागृहाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रावसाहेब मस्के यांनी केले, कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रयत गीत व स्वागत गीत सादर केली.यावेळी माजी विद्यार्थी डॉ. संभाजी डांगे,ॲड भागीरथी शिंदे,अध्यक्ष चंद्रकांत दळवी, बाळासाहेब थोरात यांनी आपली मनोगत व्यक्त केले या प्रसंगी शरद पवारांच्या मध्यस्थीने विद्यालयासाठी प्राप्त झालेल्या बारामती स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजमेंटचे नितीन धोंडे,मा.विद्यार्थी सुरेश भागवत आणि १७ लाख रुपये पेक्षा अधिक देणगी व सेवानिवृत्त निमित्ताने प्राचार्य विनायक मेथवडे यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला.
राहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि गणेश कारखान्याचे मा.अध्यक्ष नारायण कार्ले यांनीही मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात दिलीप वळसे पाटील म्हणाले,.कर्मवीरांना आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याचा समृद्ध वारसा जतन करण्याचे आवाहन केले.
डिजिटल क्रांती आणि वर्ग तेथे डिजिटल बोर्ड शरद पवार यांचे स्वप्न रयतने प्रत्यक्ष उतरवले आहे. याचे समाधान व्यक्त केले .या कार्यक्रमासाठी मा.मंत्री बाळासाहेब थोरात,खासदार निलेश लंके,चंद्रकांत दळवी,सुधीर तांबे,उपाध्यक्ष अरुण कडू,कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के,मीना जगधने,
ॲड संदीप वर्पे,बाबासाहेब भोस .राजेंद्र चांदे,सुरेश बोळीज,शिवाजी भोर, वडजे बापू,सेवानिवृत्त उपप्राचार्य रामचंद्र डोळे,दादाभाऊ कळमकर,प्रकाश निकम,सुधीर मस्के,किरण कडू,एकनाथ घोगरे,बाळासाहेब विखे, प्रभावती घोगरे,कमला म्हस्के,भीमराव आंधळे,अण्णासाहेब साबळे,विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,,बाबासाहेब नाईकवाडी,प्रमोद तोरणे,संजय नगरकर,प्रशांत बुद्धीवंत,मधुकर अनाप,प्राचार्य विनायक मेथवडे,दिलीप डहाळे, अंगद काकडे, मुख्याध्यापिका निलनी जाधव,संगीता सांगळे,डॉ. मोहन सांगळे,संजय डुबे,डॉ. संजय कांबळे,डॉ.प्रवीण बडदे,राजेंद्र म्हस्के,प्राध्यापक अमोल कडू आदिसाह विद्यार्थी आजी-माजी रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपाध्यक्ष अरुण कडू यांनी आभार मानले.
