तांभेरेच्या चंद्रगिरी परिसरातील बिरोबा डोंगराजवळ पुरुषाचा मृतदेहाने खळबळ

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी तालुक्यातील तांभेरे गावाच्या हद्दीतील चंद्रगिरी मळा परिसरात वनविभागाच्या क्षेत्रातील बिरोबा डोंगराजवळ नुकतेच सायंकाळच्या दरम्यान एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती राहुरी पोलिसांना दिली.माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलिस हवालदार बाबासाहेब शेळके,

सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे,श्री.भोसले तांभेरेचे पोलीस पाटील बाळासाहेब मुसमाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असून मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती.याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असून,पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आहे.मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी परिसरातील नागरिकांकडे चौकशी करण्यात येत असून, हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदीही तपासल्या जाणार आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!