महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे भव्य आंदोलन

Cityline Media
0
संभाजीनगर दिनकर गायकवाड‘महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती’च्यावतीने छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित केलेल्या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेते तसेच सोशल मीडियावर स्टार उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांच्या  आंदोलनाला पाठींबा दिला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडून होणारी ऑनलाईन परीक्षा पद्धत रद्द करून पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, नॉर्मलायझेशनची पद्धत रद्द करावी, शिक्षकांसाठीची टिईटी रद्द करावी,पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कडे वर्ग कलेल्या ३ आणि ४ च्या पदांच्या भरतीसाठीचा अभ्यासक्रम जाहीर करावा,वेगवेगळ्या परिक्षांसाठी वेगवेगळं शुल्क न आकारता एकच शुल्क आकारण्यात यावं आदी मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या आहेत. 

या सर्व मागण्यांसाठी सरकारकडं वारंवार निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून आणि विधानसभेतही याबाबत आवाज उठवला आहे. परंतु सरकार दुर्लक्ष करत असल्याने शेवटी आज संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. १२ जुलैपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्यानंतर यापेक्षाही अधिक मोठं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं, अपेक्षा आहे की सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेईल.आम्ही मात्र सदैव विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायम लढत राहू असे उपस्थितांकडून सांगण्यात आले.

यावेळी प्रा.विठ्ठल कांगणे, प्रा.नितेश कराळे ,कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, रविकांत तुपकर, रविराज साबळे पाटील, संतोष मगर, दीपक केदार,युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मा.आ.सुनील भुसारा, मा.आ.संजय काळे,मा.आ.संजय वाकचौरे, पंकज बोराडे, अतुल गावंडे, सिद्धू लोमटे,यांच्यासह विद्यार्थ्यांसाठी काम करणारी अनेक मान्यवर मंडळी आणि राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!