मुंबई दिपक कदम स्वराज्यातून सुराज्याच्या नवनिर्माणचे अधिष्ठान अंतर्गत स्वराज्य प्रतिष्ठान मार्फत उल्लेखनीय व विशेष कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून स्वराज्य प्रतिष्ठान, शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट व हुतात्मा बाळू गेणू स्मारक समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव व राजमाता माॅ साहेब जिजाऊ कर्तृत्व गौरव २०२६ पुरस्कार नुकताच मुंबईत दादर येथे
महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष आणि मुक्त पत्रकार दिपक कदम यांचे कार्य पाहून स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले.
दिपक कदम यांना पुरस्कार वितरण करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आप्पा पाटील, आय.पी.एस. मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्याचे उद्घाटक डॉ.सुधाकर सुराडकर, विशेष उपस्थितीमध्ये मा.
अध्यक्ष महिला आर्थिक विकास महामंडळ माजी राज्यमंत्री मा. ज्योती ठाकरे,मा.संभाजीराजे जाधवराव तर प्रमुख उपस्थितीमध्ये अभिनेत्री प्रसिद्ध माॅडेल व कोरीओग्राफर मा.पियू चौहान,संस्थापक अध्यक्ष विद्याविहार शिक्षण
समिती पालघरचे मंगला परब, समाजसेविका प्रेरणा फाऊंडेशनचे अध्यक्ष दिप्ती तथा प्रेरणा गायकर,पोलिस मित्र समाजभूषण दिलीप नारद, आरोग्यमित्र व समाजसेवक सुभाषराव गायकवाड,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता सुरेश साळवी,
समाजसेविका व उद्योजिका संगिता गुरव तसेच कार्याध्यक्ष मराठा समन्वय परिषदेचे शिवमती अनिता काळे आणि सामाजिक कार्यकर्ते,मुक्त पत्रकार व निमत्रंक हुतात्मा बाळु गेणू स्मारकाचे संयोजक सुरज भोईर,गुणवंत कामगार
डाॅ.प्रभाकर कांबळे,साहित्यिक व लेखक ॲड.सोपान बुडबारकर,गिरीश शाह, महेश कोकाटे,अनिल साळवे,मिनाक्षी आहिरे,वैशाली कांबळे, संयोजक विजय भोसले, डॉ.संजय हर्षे,सुरज भोईर,भारत खांडेकर या सर्वांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करताना उपस्थित होते.
या सर्वांनी दिपक कदम यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात व सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर विशेष सहयोग म्हणून मैत्री संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते समन्वय समितीचे लाभले तर विशेष सहकार्य मुंबई मित्र संघटनेचे लाभले .या सर्वांचे दिपक कदम यांनी आभार मानले.
