स्थानिक गुन्हे शाखेची नेवासा श्रीरामपूरात कारवाई;चोवीस लाखाचा मुद्देमाल जप्त

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने नेवासा व श्रीरामपुर तालुक्यामध्ये अवैध वाळु वाहतुकीवर छापे टाकत दोन गुन्हे दाखल करुन २४,३०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याने वाळू तस्कर बाजारात खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती घेऊन त्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केलेले आहे.या आदेशान्वये पोलिस निरीक्षक.संतोष मुटकुळे यांचे नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके तयार करण्यात आले.

पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक संदीप दरवडे,पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, गणेश लोंढे,बाळासाहेब गुंजाळ,किशोर शिरसाठ, योगेश कर्डीले तसेच पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव,पोलीस अंमलदार रिर्चर्ड गायकवाड,शामसुंदर जाधव,भगवान थोरात, रमिझराजा आतार यांचा समावेश करण्यात आलेला होता.या दोन्ही पथकास कारवाईकामी सुचना व मार्गदर्शन करुन पथके रवाना करण्यात आलेली होती.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!