पुणे नाशिक रेल्वेमार्ग सरळ मार्गासाठी देवगाव ग्रामस्थांचे संगमनेर बस स्थानकासमोर उपोषण

Cityline Media
0
सरळ मार्गासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आमदार अमोल खताळ यांची ग्वाही.

संगमनेर प्रतिनिधी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सरळ मार्गेच व्हावा,ही संगमनेरकरांची प्रमुख आणि रास्त मागणी असून या मागणीसाठी आपण कायम ठाम आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत जीएमआरटी प्रकल्पासंदर्भात तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासनाकडे स्वतः प्रभावी पाठपुरावा करू,अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा सरळ मार्ग रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ तसेच हा निर्णय तातडीने मागे घेण्याच्या मागणीसाठी देवगाव ग्रामस्थांच्या वतीने संगमनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी भेट देत आमदार खताळ यांनी आंदोलनकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला व त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा सरळ मार्ग हा संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प रद्द झाल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून हा निर्णय बदलण्यासाठी शासनाच्या सर्व स्तरांवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. रेल्वेचा सरळ मार्ग मंजूर व्हावा, यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे प्रभावीपणे प्रयत्न केले जात आहेत. नुकतीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. या बैठकीत पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सरळ मार्गेच पुन्हा प्रस्तावित करून केंद्र शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून समितीच्या अहवालानंतर केंद्र शासनाशी स्वतः पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनीही रेल्वेचा सरळ मार्गच संगमनेरच्या विकासासाठी हिताचा असल्याचे मत व्यक्त करत शासनाने रद्द करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी केली.

सरळमार्गी रेल्वे होण्यासाठी आमचा अखेरपर्यंत लढा 
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा सरळ मार्ग हा संगमनेरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भविष्यातील प्रगतीचा आधार आहे. या प्रकल्पाबाबत संगमनेरच्या हिताशी कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही. जनतेच्या भावना आणि अपेक्षा शासनापर्यंत ठामपणे पोहोचवून हा प्रकल्प सरळ मार्गेच मंजूर व्हावा, यासाठी राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडे सातत्याने आणि प्रभावी पाठपुरावा सुरू राहील. संगमनेरच्या विकासासाठी आमचा लढा अखेरपर्यंत कायम राहणार आहे.

आमदार अमोल खताळ
संगमनेर विधानसभा

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!