संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील खांडगाव येथील लष्कर सुभेदार प्रफुल्ल बाळासाहेब मोकळ यांची नुकतीच भारतीय सीमा सुरक्षा दलात निवड झाली त्यानिमित्त त्यांचा समग्र संगमनेर तालुका आंबेडकर चळवळीच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा शहरात उत्साहात पार पडला.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे असलेल्या व्यापारी असोसिएशन हॉल येथे नुकताच हा सत्कार सोहळा चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष तथा आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माणिक यादव, संगमनेर पंचायत समितीचे मा.सभापती बाळासाहेब गायकवाड रिपाइं गवई गटाचे जिल्ह्याचे नेते सुरेश देठे, साहित्यिक के.जी. रमेश रुपवते भालेराव उपस्थित होते.
संपूर्ण सत्कार सोहळ्याचे आयोजन अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव,विनोद गायकवाड सचिन साळवे,रवी दिवे यांच्या वतीने करण्यात आले.
सोहळ्याचे सूत्रसंचालन बंटी यादव यांनी केले तर प्रास्ताविक साहित्यिक के.जी. भालेराव यांनी केले.
यावेळी संगमनेर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते किशोर वाघमारे,विनोद गायकवाड,डॉ. रवींद्र घोसाळे,डी.के.जमधडे ॲड..महेश उघडे,विष्णू हरनामे,राम दारोळे आदींनी आपल्या सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी ॲड.रमेश बनसोडे,शशिकांत दारोळे, प्रकाश वाघमारे, जनार्धन गवांदे,विष्णू हरनामे,अमोल कदम,राम दारोळे, सिटीलाइन न्यूजचे महेश भोसले,सोनू गायकवाड, खांडगावचे उपसरपंच सुनील रुपवते,संदेश आढाव,जालिंदर भोरुंडे, तेजस घोसाळे,प्रतीक गवई,पवन लोखंडे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील असंख्य आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशसेवेच्या या अभिमानास्पद निवडीबद्दल लष्कर सुभेदार प्रफुल्ल मोकळ यांचा भारतीय संविधान, संविधान उद्देशिका, शाल,हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
प्रसंगी सुधाकर रोहम यांनी आपले सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून भाषण व्यक्त करताना सांगितले की प्रफुल्ल मोकळ यांचे वडील बाळासाहेब मोकळ हे आमचे सहकारी असुन ते नेहमी आंबेडकरी चळवळीत सक्रिय असतात.आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे.आंबेडकर चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या घरातील मुलगा आज देशाच्या सीमेवर रक्षणासाठी बीएसएफ मध्ये कमांडो म्हणून रुजू होत आहे. ही केवळ एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण संगमनेर तालुका आंबेडकर चळवळीची कामगिरी आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मुलमंत्र दिला कि "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा".त्याच विचाराने प्रफुल्लने देशसेवेचा मार्ग निवडला.मी प्रफुल्लला आणि त्यांच्या कुटुंबाला मनःपूर्वक अभिनंदन करतो.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो तुम्ही जिथे कुठे असाल तिथे निळ्या झेंड्याचा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा मान उंच करा.
यावेळी माणिक यादव यांनी आपल्या भाषणामध्ये
प्रफुल्ल बाळासाहेब मोकळ यांनी बीएसएफ मध्ये निवड होऊन आम्हा सर्वांचे नाव उंचावले आहे.सैन्यात जाणे म्हणजे देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असणे.
बाळासाहेब मोकळ हे चळवळीत झुंजार कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संस्कारातून घडलेला मुलगा आज देशाची सेवा करणार आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
यावेळी सत्कार सोहळ्याचे आयोजक बंटी यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले
आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. सुभेदार प्रफुल्ल यांचा सत्कार करताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे.
प्रफुल्ल हा आमच्या चळवळीचा कार्यकर्त्याचा मुलगा आहे. त्याने दाखवून दिले की शिक्षण आणि शिस्तीच्या बळावर कुठलीही उंची गाठता येते.
मी संगमनेर तालुक्यातील सर्व आंबेडकरी अनुयायांच्या वतीने प्रफुल्लला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हृदयापासून अभिनंदन करतो.पुढेही तुम्ही अशाच प्रकारे यश मिळवत राहा आणि देशाचे नाव उज्वल करा.प्रसंगी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार रवी दिवे यांनी मानले.!
