प्रचलित टप्पा अनुदानासाठी आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन

Cityline Media
0
मुंबई दिपक कदम महाराष्ट्र राज्यातील अंशतःअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रचलित टप्प्यानुसार अनुदान मंजूर करावे.या मागणी साठी मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला बळ मिळत आहे.शिक्षक समन्वय संघाच्या वतीने २२ जून पासून सुरू असलेल्या या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिक्षक भर पावसात सहभागी झाले आहेत.
आंदोलनात श्रीरामपूर येथील संत तेरेजा उच्च माध्यमिक विद्यालयाचे भाऊसाहेब तोरणे,दिपक साळवे, हेमंत त्रिभुवन, श्रीम.स्वाती लोंढे ,रुपाली शिनगारे ,श्रीम. उज्ज्वला भालशंकर तसेच अशोकनगर काँलेजचे नानासाहेब शिरोळे ,योगेश राऊत

नितीन वेताळ, सुनील औताडे  यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातून सचिन पालवे व सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहे होते.
महाराष्ट्र शासनाने वांरवार आश्वासने देवूनही अनुदानाचा प्रश्न प्रलंबित असल्याने सर्व स्तरातून नाराजी होत आहे.

अनेक वर्षांपासून अल्पशा मानधनावर सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे तातडीने सकारात्मक निर्णय घेवून प्रचलित टप्प्यानुसार अनुदान लागु करावे अशी आदोलकांची प्रमुख मागणी आहे.

समन्यक संघाच्या वतीने खंडेराव जगदाळे यांनी शिक्षकांच्या या व्यथा मांडल्या आणि त्यांनी सलग दहा वर्षांपासून पायात चप्पल घालणार नाही असे वचन घेतले आहे.ते म्हणाले की, जेव्हा माझ्या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळेल तेव्हाच मी पायात चप्पल घालीन आणि त्यांची सुरुवात याच आझाद मैदानावरून तुमच्याच समोरून करील अशी त्यांची शपथ दहा वर्षांपासून घेतली आहे.आणि शासनाच्या उदासीन धोरणावर भाष्य केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!