सात्रळ महाविद्यालयातील ९५ विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीचा लाभ

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ट्रेनिंग प्लेसमेंट सेलच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित बँकेच्या विविध पदांसाठी नुकत्याच मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या.यात एचडीएफसी बँक,आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक यांचा समावेश होता.
या मुलाखती दरम्यान महाविद्यालयातील, प्रवरा परिसर तसेच विविध महाविद्यालयातून ९५ विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी दिली.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील,मा.मंत्री आण्णासाहेब म्हस्के सौ. शालिनीताई विखे पाटील, मा.खा.डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील ,

सहसचिव भारत घोगरे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ,अतांत्रिक विभागाचे शिक्षण संचालक व प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. पंचक्रोशीतील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल,माजी विद्यार्थी,सर्व प्राध्यापक,प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी खूप खूप परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!