नवी मुंबईत एम एस एम इ गौरव सोहळा उत्साहात

Cityline Media
0
 कोकणगाव जागृक युवा ग्रुपच्या वतीने १२० महिला पुरुषांची उपस्थिती.
नवी मुंबई मच्छिंद्र पवार एमएसएमई दिनाचे औचित्य साधून सिडको कन्व्हेन्शन सेंटर,वाशी, नवी मुंबई येथे आयोजित 'एमएसएमई समिट आणि अवॉर्ड्स सोहळ्यास संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील जागृक युवा ग्रुपच्या वतीने १२० महिला,पुरुष निमंत्रित करण्यात  आले होते.
याप्रसंगी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यात आला प्रसंगी उपस्थितांशी बोलताना, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात आणि रोजगाराच्या निर्मितीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे  योगदान अतुलनीय आहे.या क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे संयोजकांनी सांगितले.

नवीन पिढीने नोकरी मागण्यापेक्षा 'नोकरी देणारे' बनावे. यामध्ये महिला उद्योजकांचा सहभाग वाढावा यासाठी शासन विशेष सवलती आणि आर्थिक साहाय्य देत आहे.नव उद्योजकांच्या कल्पकतेला बाजारपेठ मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी महायुती सरकार सक्षम आहे.

येथे सन्मानित झालेले उद्योजक हे केवळ व्यावसायिक नाहीत,तर ते महाराष्ट्राचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. तुमच्या या यशाने इतर हजारो तरुणांना उद्योग क्षेत्रात उतरण्याची प्रेरणा मिळेल.तुम्ही उद्योग वाढवा, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

या सोहळ्याला प्रधान सचिव डॉ.पी. अनबलगन, विकास आयुक्त श्रीमती कादंबरी बलकवडे, जॉईन्ट सीईओ डॉ. कुणाल खेमनर, सचिव गोपाळ पुंगुलवार, पद्मश्री मिलिंद कांबळे आणि एमएसएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!