संगमनेरात उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चाचे आयोजन.

Cityline Media
0
संगमनेर प्रतिनिधी  नितीनचंद्र भालेराव अनुसूचित उपवर्गीकरणाच्या जातींच्या निर्णया विरोधात संगमनेर तालुक्यातील समस्त आंबेडकरी समाज एकवटला आहे.या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात एकीची वज्रमूठ आवळली आहे.या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि तो रद्द करण्याच्या मागणीसाठी २ जुलै रोजी संगमनेर शहरात विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे.या महामोर्चाचे आयोजन संगमनेर तालुका अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सामाजिक संघटना, बौद्ध उपासक-उपासिका, युवक-युवती, माता-भगिनी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मोर्चाची पूर्वतयारी आणि नियोजनाबाबत माहिती देताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणे हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून,तो अनुसूचित जातींच्या एकसंध ताकदीमध्ये फूट पाडण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सामाजिक एकतेच्या आणि समतेच्या विचारांना हरताळ फासणारा हा निर्णय असून यामुळे समाजाचे घटनात्मक आरक्षण धोक्यात येईल,अशी भीती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा लढा केवळ एका जातीचा नसून संपूर्ण अनुसूचित जातीच्या अस्तित्वाचा आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा महामोर्चा २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होईल.मोर्चाचा समारोप प्रांत कार्यालयावर होणार असून त्या ठिकाणी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!