नाशिक दिनकर गायकवाड नाशिक जिल्ह्यातील बागलाण(सटाणा) तालुक्यातील कोळीपाडा,दोधेश्वर रोड येथे पशुपालकांसाठी उत्कृष्ट दर्जाचा मूरघास (सायलेज) उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम येथील प्रगतशील शेतकरी कैलास कोंडाजी पानसरे यांनी सुरू केल्यामुळे सर्वत्र या मुरघासाची उपलब्धता होण्यासाठी आणि जनावरांना पोषक चारा मिळण्यासाठी कैलास पानसरे सातत्याने प्रयत्नशील आहे.
पशुपालक आणि गोधन असणारे शेतकरी या मुरघासामुळे समाधान व्यक्त करित हा मुरघास बागलाणसह नाशिक जिल्ह्यात अगदी जिल्हा बाहेर देखील शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गाय,म्हैस,शेळी व मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभर सकस व पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध व्हावा, जनावरांचे आरोग्य चांगले राहावे आणि दुधाच्या उत्पादनात चांगल्या पटीने वाढ व्हावी या उद्देशाने उच्च प्रतीचा मूरघास तयार करण्यात आला आहे.
हिरव्या चाऱ्याची टंचाई असलेल्या काळात हा मूरघास पशुपालकांसाठी मोठा आधार ठरणार असून, स्थानिक तसेच परिसरातील सर्व पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन कैलास कोंडाजी पानसरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे केले.
इच्छुकांनी ९५४५२२७८३२ या दुरध्वनीवर संपर्क करावा तसेच कोळीपाडा,दोधेश्वर रोड,ता. बागलाण, जि.नाशिक येथे शेतकऱ्यांना मुरघास सहज उपलब्ध होईल असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
