झरेकाठी सोमनाथ डोळे नगर मनमाड व नाशिक पुणे महामार्गाला जोडणाऱ्या ५० कि.मी अंतराचा संगमनेर ते गुहा रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याला पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे अपघातास निमंत्रण मिळते रोज कुणाचातरी अपघात या रस्त्याला ठरलेलाच असतो तसेच नागरिकांची मोठी वर्दळ आणि आमची वाहनांचे दळणवळणांचे प्रमाण देखील जास्त आहे.
प्रामुख्याने शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असून या रस्त्याने नागरिकांना जातांना येताना खड्ड्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे विद्यार्थी व इतर नागरिकांचा अनेक वेळा मोठमोठे अपघात या खड्ड्यामुळे झाले आहे.
गेली दहा-पंधरा वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्याला मोठमोठी खड्डे पडत दोन्ही बाजूला मोठे भगदाड पडण्याची दाट शक्यता आहे तसेच बाजूला काट्या असल्याने मोठमोठे अपघात या रस्त्यावर झाले आहे.
येथे होणाऱ्या अपघाताला कारणीभूत सार्वजनिक बांधकाम विभाग असून बांधकाम विभागाला जाग येण्यासाठी डॉ सुजय राधाकृष्ण विखे पाटील प्रणित जनसेवा युवा मंच झरेकाठीच्या वतीने मोठे आंदोलन करणार असल्याचा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी दिला आहे.
रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्याच मोठ मोठी खड्डे तात्काळ बुजून रस्ता हा रुंदीकरण करून एका वेळी दोन गाड्या प्रवास करतील व या रस्त्याला दोन्ही बाजूने फुटपाथ स्वरूपामध्ये
मोटरसायकलला व विद्यार्थ्यांना जाण्यासाठी जागा ठेवावी व रस्त्याचे काम तात्काळ रुंदीकरण करून डांबरीकरण करावे.अशी मागणी यावेळी डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील प्रणित जनसेवा युवा मंचचे झरेकाठी सदस्य स्वप्निल वाणी,
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे,राहुल वाणीअभिनव वाणी यांनी केले असून लवकरच या रस्त्याचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना व राहुरी मतदार संघाचे आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले,
प्राजक्ता तनपुरे यांना सुजय राधाकृष्ण विखे पाटील प्रणित जनसेवा युवा मंच झरेकाठीच्या वतीने निवेदन देणार आहे निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी व रस्ता डांबरीकरण करण्यासाठी तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी डॉ .सुजय राधाकृष्ण विखे पाटील प्रणित जनसेवा युवा मंच झरेकाठी कार्यकर्ते सोमनाथ डोळे , बलराज पाटील,मा. सभापती भिमराज हारदे,माधव हारदे,सरपंच सतीश जोशी,रमेश पन्हाळे,भिकाजी वाणी,डॉक्टर रमेश वाणी, आदींनी मागणी करत इशारा दिला आहे
