अनिल कोळसे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Cityline Media
0
पत्रकारितेतील निर्भीड आवाजाला मोठी जबाबदारी


मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटनेच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर या महत्त्वपूर्ण पदावर  राहुरी येथील पत्रकार अनिल कोळसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश सोमाणी व राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांनी अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली.

पत्रकारिता क्षेत्रात गेली २० ते २२ वर्षे कार्यरत असलेले अनिल कोळसे हे निर्भीड, परखड आणि सामाजिक भान जपणारे पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत पत्रकारितेची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे.

त्यांचे स्वतःचे ‘सार्वमंथन’ हे दैनिक असून, त्यांची शासकीय यादीवर असलेली स्वतःची स्वराज प्रिंटिंग प्रेसही कार्यरत आहे. त्यामुळे पत्रकारिता आणि व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सामाजिक कार्यातही अनिल कोळसे यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, पत्रकारांच्या विविध समस्यांवर त्यांनी अनेक ठिकाणी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्याची धुरा सोपवली आहे.

संघटनेच्या ध्येय-धोरणांच्या अधीन राहून जिल्ह्यात संघटना अधिक बळकट करण्यासाठी ते प्रभावी काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.अनिल कोळसे यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, पत्रकार क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.लवकरच अहिल्यानगर उत्तर नगर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात येणार असल्याची ही माहिती अनिल कोळसे यांनी दिली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!