श्रीरामपूरला भव्य ओळख;छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन

Cityline Media
0


श्रीरामपूर दिपक कदम शहराच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
श्रीरामपूरकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रवेशद्वारात स्थापित असलेल्या बजरंग बली यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून विधिवत करण्यात आली.

यावेळी परिसरात भक्तीमय तसेच उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.या सोहळ्यास काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आमदार हेमंत ओगले, नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे,दिपाली ससाणे, मा.आमदार भानुदास मुरकुटे,मा. नगराध्यक्ष संजय फंड, उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फर शेख, अण्णासाहेब डावखर, अशोक उपाध्ये,अशोक बागुल,रियाज पठाण, जफर शाह,ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, भाऊ कोठारी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीरामपूर शहराला भव्य आणि ऐतिहासिक ओळख देणारे हे प्रवेशद्वार उभारण्यात आले असून,यामुळे शहराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडणार आहे.अनेक वर्षे “विनावेशीचे गाव” अशी ओळख बनलेल्या श्रीरामपूरसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला श्रीरामपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.शहराच्या विकासाच्या दिशेने हे प्रवेशद्वार एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!