श्रीरामपूर दिपक कदम बहुजन शिक्षण संघ संचलित शहरातील शंभुक विद्यार्थी वसतिगृहात नगरसेवक श्रीनिवास बिहाणी,मा.नगरसेवक व जय माताजी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश अलघ, रिपाइंचे उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व जिल्हा परिषदेचे मा.सभापती बाबासाहेब दिघे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यामध्ये प्रत्येकी बारा वह्या,स्कुल बॅग, कंपास बॉक्स,रायटींग पॅड,पेन शिस पेन्सिल,पाणी बॉटल इ.चा समावेश होता.याप्रसंगी सोमय्या हायस्कूलचे अध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेविका सौ.वैशाली चव्हाण,मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे,
परिवर्तन फाउंडेशनचे सचिव सुभेदार कृष्णा सरदार,आवाज जनतेचा न्युज चॅनेलच्या संपादिका विजया बारसे,संसिध्दी प्रतिष्ठानच्या सचिव राधिका करवा,विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सचिव डॉ.जालिंदर घिगे,व सामाजिक कार्यकर्ते ए.पी.बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथम विद्यार्थ्यांनी परिवर्तनशील स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृह प्रमुख अशोक दिवे यांनी केले.सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वसतिगृहाच्या भोजन व्हॉल बांधकामास मदत देण्याचे जाहीर केले व नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे जाहीर केले तसेच कृष्णा कलेक्शनचे संचालक पुरुषोत्तम झवर यांनी बांधकामास लागणारे स्टील देण्याचे घोषित केले.
आवाज जनतेचा न्यूज चॅनलच्या संपादिका विजया बारसे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी परिस्थितीचे भान ठेवून अभ्यास करून आईवडीलांचे व वसतिगृहाचे नाव रोशन केले पाहिजे.
कार्यक्रमास बहुजन टायगर फोर्सचे अध्यक्ष संजूभाऊ रुपटक्के, बैतुशिफा हॉस्पिटलचे संचालक डॉ.सलिम शेख,भाजपा अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष आसिफ पोपटिया वंचित बहुजन आघाडीचे संतोष त्रिभुवन,रंभाजी कोळगे, रामदास आढाव,वसंत पवार,शाहीर भिमराव कदम,कवी आनंदा साळवे,शाहीर नरवडे,दादासाहेब बनकर,मातृ पितृ छाया प्रतिष्ठानचे अध्यक्ष उत्तम शेलार,कविता दिवे, सिध्दार्थ दिवे ह.भ.प.अरुण कुर्हे, विद्यार्थी पालक वर्ग यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
