वरवंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत ९३ टक्के निकाल

Cityline Media
0
वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्तेत उत्कृष्ट यश संपादन केल्याने पंचक्रोशीतुन विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले जात आहे.
प्रथम इयत्ता तिसरी मध्ये सौ.सुवर्णा विकास वर्पे व इयत्ता चौथीसाठी सौ.सुशिला भाऊसाहेब शेळके यांनी विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण दिले व त्यांचा चांगला सराव करून घेतला .
 परीक्षेला एकूण पंधरा विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक विद्यार्थिनी परीक्षेला काही कारणाने हजर न राहिल्याने एकूण चौदा मुलांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली.

त्यात सर्व मुले उत्तीर्ण झाली गैरहजर विद्यार्थिनी परीक्षेला हजर असती तर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असता असा विश्वास शिक्षिका शेळके यांनी व्यक्त केला.
सर्व विद्यार्थ्यांमधून एकूण पाच मुलांनी ३०० पैकी २०० हून अधिक गुण मिळवले यामध्ये प्रथम क्रमांक कु.संघमित्रा मेहरखांब (गुण २५४ ) द्वितीय क्रमांक चि.यशराज भाऊसाहेब वर्पे( गुण २४०तृतीय क्रमांक कु.आरती मच्छिंद्र वर्पे (गुण २३२) चतुर्थ क्रमांक चि.विवेक संपत भोसले (गुण २१४) चि. कृष्णा अंकुश काळे यांनी चांगले गुण संपादित करून शाळेचे नावलौकिक केले.

मराठी माध्यमाच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे,खेडेगावातील शाळेकडे दुर्लक्ष केले जात आहे पालक इंग्रजी माध्याकडे वळत आहे.मुलांचे हे यश त्या पालकांसाठी एक दखलपात्र आहे आपण प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन देखील चांगले यश संपादन करू शकतो हे यातून दिसून येते शाळेतील शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!