झरेकाठी सोमनाथ डोळे नगरचे जंतर-मंतर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी स्मारक,वाडिया पार्क येथे विद्यार्थी संघर्षाच्या यशाचा कृतज्ञता उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. देशभरातील विद्यार्थी, तरुणाई, पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याला मिळालेल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात उपस्थितांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला तसेच नैसर्गिक रंग लावून देशभक्तीच्या गीतांच्या तालावर उत्स्फूर्तपणे नृत्य केले. संपूर्ण परिसरात प्रचंड उत्साह,आनंद आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी उपस्थितांनी “लोकतंत्र को खतरा होगा, संघर्ष फिर गहरा होगा” तसेच “कल भी तुमसे लढे है, आगे भी तुमसे लढेंगे” अशा जोरदार घोषणा दिल्याने मैदान दुमदुमून गेले. या घोषणांमधून शिक्षणातील पारदर्शकता, न्याय आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीचा संघर्ष पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास नंदाताई पांडुळे,सपना आसावा,अपूर्वा बोरा, संतोष धर्माधिकारी, तुलसीबाई पालीवाल,जालिंदर बोरुडे,,
भारती शिंदे,लीना ठाकरे,प्रिंयका धायतड़क,प्रियंका बर्फे, राणी बर्फे,समर्थ पिंगट,आरती अरगडे, अर्चना यमगर, जिनत जमादार, सूरज ढवळे, सुजित नवसरे अनेक नागरिक व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी सांगितले की, हा उत्सव केवळ आनंद व्यक्त करण्यासाठी नसून शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा,विद्यार्थ्यांचे हक्क आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने उभे राहण्याचा संकल्प आहे.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
