ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीच्या बैठकीत निर्णय
श्रीरामपूर दिपक कदम आज अनेक ठिकाणी मिशन मालमत्ता,चर्च व संबंधित कागदपत्रांची चौकशी होत आहे अशा परिस्थितीत सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाने एकसंघ राहून समाजाच्या हिताचे संरक्षण करण्याची वेळ आली असल्याची भावना श्रीरामपूर येथे झालेल्या ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली.
अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ज्या ख्रिस्ती समाजाचे शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव योगदान राहिलेले आहे अशा शांतताप्रिय समाजाला येनकेन प्रकारे विनाकारण लक्ष केले जात असल्याने उपस्थित ख्रिस्ती बांधवांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.
निरंतर होत असलेल्या घटनांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला येणाऱ्या काळामध्ये धर्मगुरू,पास्टर्स,व चर्च वर होणारा अन्याय हा आपल्या तमाम ख्रिस्ती समाजावर झालेला हल्ला आहे असे समजून येणाऱ्या काळात मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा बैठकीमध्ये देण्यात आला.
या बैठकीस,ॲड.विनायक पंडीत,ॲड.राजेंद्र भोसले, फा.मायकल वाघमारे, फा.अब्राहम रननवरे, फा.पीटर डिसोझा,फा.डॉमिनिक रोझारिओ, फा. सतीश कदम, फा.राजेंद्र लोंढे, पा.अण्णा अमोलिक,पा.राजेश कर्डक, पा.शैलेश अमोलिक,
पा,मार्कस भोसले, पा.विश्वास चक्रनारायण, पा.अविनाश सरोदे,ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीचे अध्यक्ष अनिल भोसले,समन्वयक रंजन साळवी,पी. एस.निकम,प्रवीणराजे शिंदे,दीपक कदम, प्रशांत केदारी,सचिन ब्राह्मणे, प्रदिप भोसले, रविंद्र लोंढे राजन नायर,हेमंत बर्से,प्रमोद पारध्ये आशिष बनसोडे,,प्रकाश लोखंडे,सतीश क्षेत्रे, निखिल भोसले,कुंदन आरवडे,आंतोन भोसले,अजय हिवाळे,राजेंद्र भोसले,आदींसह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.
