श्रीरामपूर दिपक कदम सामाजिक,आरोग्य व रक्तदान क्षेत्रात गेली ३६ वर्षे निष्काम सेवा करणारे श्रीरामपूरचे समाजसेवक अभयकुमार तेलतुंबडे यांची रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस.यादव यांनी त्यांची नियुक्ती केली अभयकुमार तेलतुंबडे यांचा सेवाभावी प्रवास:रक्तदान ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेले अभयकुमार यांनी आतापर्यंत १२७ वेळा संपूर्ण रक्तदान १ वेळा एडीपी डोनेशन एकूण १२८ वेळा रक्तदान केले आहे.तसेच
संस्थात्मक कार्य साईसेवा आणि मुठेवाडगाव रक्तदान परिवार चे संस्थापक सदस्य शिव आरोग्य सेना श्रीरामपूर तालुका समन्वयक अरिहंताण रक्तसारथी संस्थान व सोनल फौंडेशनचे इंडिया समन्वयक तसेच सोशल वेल्फअर असोसिएशनचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
१९८९ पासून नियमित रुग्णसेवा थॅलेसेमिया निर्मूलन,रक्तदान शिबिरे, आरोग्य जनजागृती, पर्यावरण, व्यसनमुक्ती, स्वच्छता अशा सर्वच सामाजिक व धार्मिक कामात नेहमीच अग्रेसरअसतात
- कोरोना काळातील कार्य कोरोना काळात ३ ही लाटेमध्ये रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे, बेड,रेमडेसिव्हर, प्लाझ्मा व औषधी उपलब्ध करून दिली यासाठी कोरोना योद्धा सन्मानसह अनेक संस्थांकडून सन्मानित
नॅशनल पुरस्कार भटींडा-पंजाब, सोनभद्र-उत्तरप्रदेश, कोटा, दरभंगा-बिहार, हैद्राबाद-तेलंगणा, दुधीनगर येथे वीर बिरसा मुंडा पुरस्कार तसेच २८ जून २०२६ रोजी मालाड-मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६ने सन्मानित, नुकतेच मुंबईतील मालाड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सन्मान सोहळ्याची संपूर्ण व्यवस्था त्यांनीच पार पाडली परिसरातील व जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांचा मोठा आधार व सहकार्य लाभते, संपूर्ण भारतभर ते रक्तदानाची चळवळ प्रभाविपणे राबवतात,
अभयकुमार तेलतुंबडे यांच्या या नियुक्तीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील रुग्णसेवा व श्रमिक कामगारांच्या प्रश्नांना अधिक बळ मिळेल,अशी अपेक्षा आहे
