लोणीच्या रयत विद्यालयात विविध स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान.

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील रयत शिक्षण संस्थेचे प.डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, येथे सन २०२५–२६ मध्ये शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व त्यांना घडविणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा भव्य गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
सोहळ्यात रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शनक शिक्षक यांचा गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमास मा. प्राचार्य  ‌ एस.एस.डहाळे ज्येष्ठ शिक्षक. श्री.सिनारे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती बेंद्रे तसेच श्री.साबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
विद्यालयाने यंदा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले. इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत ७ विद्यार्थी, इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत २५ विद्यार्थी, नवोदय प्रवेश परीक्षेत १ विद्यार्थी,रयत ऑलिम्पियाडमध्ये ३ विद्यार्थी, कर्मवीर विद्याप्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेत १ विद्यार्थी तसेच उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक परीक्षेत ४ विद्यार्थी यशस्वी ठरले.
इयत्ता ५ वी नवोदय प्रवेश परीक्षेत कु.शरयु साहेबराव किरवे हिने यश मिळवून विद्यालयाचा गौरव वाढविला.

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश सोमनाथ सिनारे (२६०), श्रावणी योगेश गोर्डे (२४४), दिशा हरिभाऊ ठाणगे (२४२), सानवी पांडुरंग सदगीर (२३८), श्रेयश विठ्ठल चव्हाण (२३८), हर्षिता विनायक झावरे (२३४) आणि आरव योगेश पन्हाळे (२२६) यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली.

इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत सानवी अनिल धिरडे (२६६), आराध्या बाळासाहेब दिघे (२५८), ईश्वरी संतोष रांधवणे (२५४), सार्थक महेश गायकवाड (२५२), कृष्णा बाबासाहेब काळे (२५२), आयुष सुनिल थेटे (२५०), संस्कृती संदीप अंत्रे (२४८), आनंद विजयकुमार रासकर (२४८), साईशा मच्छिंद्र मगर (२४६), वेदांत रमेश भालेराव (२४६), अफ्फान इरफान शेख (२३६), अश्विन शिवाजी सोमवंशी (२३४), ईश्वरी भगीरथ वर्पे (२२८), अनुष्का अशोक गागरे (२२८), साई अतुल चोपडे (२२६), विनया रविंद्र काळे (२२६), सोहम विठ्ठल चव्हाण (२२६), सर्वेश जवाहरलाल पांडे (२२४), दर्श चंद्रशेखर कुलकर्णी (२२२), अभिनव नवनाथ गुळवे (२२०), संस्कृती सचिन कानडे (२२o), अवनी रामदास भालेराव (२१४), अक्षरा सुदाम खर्डे (२१०), अक्षदा संपत गोडे (२०४) आणि अवधूत गोरखनाथ आंबेकर (२००) यांनी घवघवीत यश मिळविले.

कर्मवीर विद्याप्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेत इयत्ता ५ वीचा विद्यार्थी यश सोमनाथ सिनारे याने संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला.

इयत्ता ९ वी रयत ऑलिम्पियाड परीक्षेत यशराज विठ्ठल वेताळ, पियुष वेणूनाथ गागरे आणि अथर्व अनिल शिंदे यांनी यश संपादन केले.

उत्तुंग तेज बाल वैज्ञानिक परीक्षेत कु. सानवी अनिल धिरडे हिची इस्रो व आयआयटी शैक्षणिक सहलीसाठी निवड झाल्याने विद्यालयाच्या यशात आणखी भर पडली.

या यशामागे विभागप्रमुख व मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. ५ वी नवोदय विभागप्रमुख के.आर अंत्रे , ५ वी शिष्यवृत्ती विभागप्रमुख एन.डी. जाधव व सौ. ए.एस.कदम., ८ वी शिष्यवृत्ती विभागप्रमुख श्रीमती पी.डी ढोकणे कर्मवीर विद्याप्रबोधिनी विभागप्रमुख श्रीमती एस.ए.पोखरकर  ९ वी रयत ऑलिम्पियाड विभागप्रमुख पी.बी. कुलथे तसेच उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक परीक्षा विभागप्रमुख श्रीमती एस.ए.कर्डिले यांच्यासह इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक व सेवकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, विभागप्रमुख व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य एस.एस.डहाळे, म. प्राचार्य एल.सी.. रक्टे, माजी पर्यवेक्षिका श्रीमती कडू  माजी पर्यवेक्षक श्री. भुसाळ तसेच सर्व शिक्षक व सेवकवृंद यांनी अभिनंदन केले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू  उत्तर विभागीय अध्यक्ष रोहित पवार  मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मा. मीना जगधने, जनरल बॉडी सदस्य एकनाथ घोगरे  विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे  सहाय्यक विभागीय अधिकारी मा. बाबासाहेब नाईकवाडी गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर, उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्य उत्तम आहेर स्कूल कमिटी सदस्य बाळासाहेब विखे  सरपंच  जनार्धन घोगरे  तसेच कृषिभूषण मा. प्रभावती घोगरे  यांनी विद्यालयाचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किरवे यांनी केले.

"सर्वोत्कृष्ट शिक्षण, सर्वोत्तम गुणवत्ता हाच एकमेव ध्यास" या ब्रीदवाक्याला साजेशी ही उल्लेखनीय कामगिरी असून, प. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयाने गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!