झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी तालुक्यातील
सात्रळ,सोनगाव पंचक्रोशीतील शेतकरी बांधव,वीजग्राहक व नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत अनियमितता व सुरळीत होत नसून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा करत महावितरणच्या सात्रळ विभागाच्या आवारात सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते ,धरणे धरो आंदोलन सुरू केले होते.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे सांगितले.आंदोलक शेतकरी तसेच ग्रामस्थानी केलेल्या मागण्याचे निवेदन महावितरणच्या अभियंता किशोर पाटील तसेच विभागातील उपविभागीय अभियंता दिलीप गाढे यांना दिले आहे.
निवेदनात सात्रळ विभागाला तात्काळ पूर्णवेळ अभियंता नियुक्त करावा,शेतीसाठी सलग आठ तास वीजपुरवठा द्यावा, सात्रळ वीज विभागाचे कार्यालय गावात स्थलांतरित करावे,आठवड्यातून एकदाच नियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा खंडित करावा;
त्याच कारणासाठी वारंवार वीजपुरवठा बंद करू नये,सर्व भागात पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा,शेतीसाठी आठ तास वीज मिळत नसेल तर यापुढे पंचक्रोशीतील ग्रामस्थ घरगुती वीज बिल भरणार नाही यासाठी महावितरणला कुठलेही सहकार्य ग्रामस्थ करणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
अंदोलनास्थळी उपस्थित असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून समर्पक तसेच ठोस उत्तरे न मिळाल्याने आंदोलन चालूच राहणार असल्याचे समजते.या आंदोलनात किरण कडू, बलराज पाटील, बाळासाहेब डुकरे,अमोल दिघे,
अवधूत चोरमुंगे,परशराम साबळे,नंदू कडू,बापू दिघे,संभाजी कडू,हर्षल कडू,संजय निधाने,सागर डुकरे, कैलास पडघलमल, अण्णा अनाप,योगेश पडघलमल, दत्तू पडघलमल,बाळासाहेब डुक्रे,संदीप डुक्रे,माऊली अनाप,निखिल डुक्रे, हरिभाऊ सिनारे ,किरण अंत्रे तसेच परिसरातील सर्व पक्ष कार्यकर्ते व अनेक संघटनेचे पदाधिकारी,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
