संगमनेरला कामगार रुग्णालयाच्या कामास प्रारंभ

Cityline Media
0
चार दशकांपासूनची कामगारांची प्रतीक्षा संपली;आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यास यश 

संगमनेर प्रतिनिधी तब्बल चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या  कामगार रुग्णालयाचे स्वप्न अखेर साकार होत आहे.आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रुग्णालयास शासनाची मंजुरी मिळाली असून शहरातील जाणता राजा मार्गावरी स्टेट बँकेच्या समोर असणाऱ्या इमारतीत या रुग्णालयाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे. लवकरच हे रुग्णालय संगमनेर तालुक्यातील कामगारांच्या सेवेत दाखल होणार आहे या  रुग्णालयाचा  कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना  लाभ होणार आहे.
    संगमनेर तालुक्यातील कर्मचारी राज्य विमा योजने अंतर्गत येणाऱ्या कामगारांना उपचारासाठी नाशिक,अहिल्यानगर तसेच इतर शहरांमध्ये जावे लागत होते.त्यामुळे वेळ,पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

संगमनेर मध्येच कर्मचारी राज्य विमा योजना रुग्णालय सुरू व्हावे,यासाठी आमदार खताळ यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या कामगार रुग्णालयाचे प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे.

या रुग्णालयाच्या माध्यमातून कामगारांना प्राथमिक उपचार,तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन,विविध वैद्यकीय तपासण्या, औषध उपचार तसेच इतर आवश्यक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे कामगारांना दर्जेदार, जलद आणि सुलभ आरोग्यसेवा मिळणार असून बाहेरगावी जाण्याची गरज लागणार नाही.

संगमनेरच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामगारांची मागणी आता पूर्णत्वास येत असल्याने विविध कामगार संघटना, सामाजिक संस्था तसेच नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शासनाकडून मंजुरी मिळवून हा प्रकल्प मार्गी लावल्या बद्दल कामगारांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहे .
हजारो कामगारांना मोठा दिलासा-शेवाळे 
    संगमनेर शहरातील जाणता राजा मार्गावर कामगार रुग्णालय सुरू  झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यातील हजारो कामगार आणि  त्यांच्या कुटुंबीयांना त्याचा थेट लाभ होणार आहे. सर्वसामान्यांना अधिक सक्षम आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल. लवकरच हे रुग्णालय सुरू होऊन कामगारांच्या सेवेत दाखल होणार आहे 

  सुशील शेवाळे,
 तालुकाध्यक्ष,युवा सेना, संगमनेर
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!