लालपरीच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर आगारात ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प.

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम शहरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महामंडळाच्या आगारात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या हस्ते व पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी व परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी,प्रवासी संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
लालपरीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त "७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प" या उपक्रमाअंतर्गत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,श्रीरामपूर आगार तसेच प्रवासी संघटना,श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथे करण्यात आला.

पर्यावरण संवर्धन,प्रदूषणमुक्त समाजाची निर्मिती आणि हरित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

उपस्थितांनी राज्यभर ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा केली.यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष मा.प्रमोद मोरे,

अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे, श्रीरामपूर आगार प्रमुख अनिल बेहेरे, प्रवासी संघटनेचे किशोर फुणगे,कार्याध्यक्षा छाया राजपूत,कार्याध्यक्ष निर्मला मस्के,छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षा मंगल काळे, सौ.जाधव,

राज्य उपाध्यक्ष डॉ.अनिल लोखंडे,आदर्श सरपंच बाळासाहेब ढोले,जिल्हा संघटक अर्जुन राऊत,राज्य संघटक बाळासाहेब गाडेकर, राज्य मिडिया प्रमुख प्रा.चंद्रकांत भोजने, निवेदक सोपान वायाळ, सौ.मीनाक्षी मोरे,सौ. वंदना भोजने,सौ.स्वाती वायळ,एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोल पटारे, एसटी अधिकारी, कर्मचारी, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि अनेक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे सांगून, समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!