विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लोणीच्या रयत संकुलनात माता पालक मेळावा उत्साहात

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील लोणी येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयात रयत शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'माता पालक मेळावा' या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांचा मोठा उत्साह दिसून आला.
संस्थेच्या वतीने आयोजित या माता पालक मेळाव्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित न करता त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा होता. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत इतर कोणतीही कला जोपासली पाहिजे.

अंगी असलेल्या विद्यार्थ्यांच्या कला गुन्हा नाही पालकांनी वाव द्यायला हवा त्यांच्या प्रत्येक गोष्टी मागचा होरा ओळखून प्रोत्साहनही द्यायला हवे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्था सातारा उत्तर विभागीय सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणे यांनी केले.कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करत शिक्षण संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.शालिनी बाळासाहेब विखे होत्या.अध्यक्ष स्थानावरून बोलताना सौ.शालिनी विखे यांनीही माता महिला पालकांना मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.

 याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासन कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रभावती जनार्दन घोगरे यांनीही आपली उपस्थिती दर्शवून माता महिला पालकांना अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की महिलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार लहानपणापासून फक्त आईच करू शकते.
अभ्यासावरून मुलांची तुलना इतरांशी करू नका त्यांच्याकडे असलेल्या गुणांना ओळखा मोबाईलचा वापर आपला मुलगा कसा करतोय याकडे लक्ष द्या अभ्यासाबाबतही काही अडचणी असल्यास त्या वर्ग शिक्षकांशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करा.असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,तसेच पालकांना मुलांच्या जडणघडणीत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात एस.एस किरवे यांच्या प्रास्ताविकाने झाली.या मेळाव्याचे सूत्रसंचालन श्रीमती एस डी.दाभाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अंतिमतःश्रीमती ए.बी बेंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या संपूर्ण मेळाव्याच्या यशस्वी आयोजनात मुख्याध्यापक एस.एस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या मेळाव्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात एक सकारात्मक संवाद प्रस्थापित झाला असून,विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रोत्साहन देणारा हा एक अविस्मरणीय सोहळा ठरला आहे.लोणी येथे पार पडलेल्या या माता पालक मेळावा मध्ये असंख्य माता आपल्या रोजच्या धावपळीच्या कामातून वेळ काढून आल्या याबद्दल विद्यालयानेही सर्वांचे आभार व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!