संगमनेरला रंगला विठ्ठल नामाचा गजर, अभंग भक्तीगीतांनी रंगला वारकरी वाईब्स सोहळा

Cityline Media
0
संगमनेरकरांनी शिवसेना महायुतीच्या भक्ती संगीत कार्यक्रमास दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमनेर प्रतिनिधी कामिका एकादशीच्या पावन दिनी संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेला ‘वारकरी वाईब्स’ हा भव्य सांगीतिक सोहळा मालपाणी लॉन्स येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विठ्ठल नामाचा गजर,टाळ-मृदंगाचा निनाद,वारकरी परंपरेतील अभंग आणि भक्तिरसपूर्ण गीतांनी संपूर्ण परिसर अक्षरशःदुमदुमून गेला होता या भक्ती शक्तीच्या अनोख्या कार्यक्रमाला संगमनेरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा,संतांचे विचार आणि भक्ती शक्तीची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिवसेना महायुती,संगमनेर यांच्या वतीने या अनोख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्यासह शिवसेना महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला   संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या भक्ती शक्तीच्या मिलाफला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सर्व कलाकारांच्या कलेचे कौतुक केले.या सांगीतिक सोहळ्यात विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.संत ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम महाराज तसेच समस्त संतांच्या अभंग आणि विचारांचा जागर करण्यात आला.

टाळ-मृदंगाच्या तालावर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात उपस्थित भाविक भक्तिरसात तल्लीन झाले.नव्या पिढीला वारकरी परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न वारकरी विबेस च्या माध्यमातून पारंपरिक वारकरी संस्कृतीला आधुनिक सांगीतिक सादरीकरणाची जोड देत नव्या पिढीला संतपरंपरा आणि विठ्ठल भक्तीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

विठ्ठल नामामध्ये एकरूप होण्याची’ भावना या संपूर्ण सोहळ्या मधून प्रकर्षाने जाणवली. संगमनेर कर जनतेच्या सांस्कृतिक विश्वात या कार्यक्रमाने एक वेगळीच छाप निर्माण केली.भक्ती,संगीत आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम या निमित्ताने अनुभवायला मिळाला.

संपूर्ण परिसरात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणामुळे उपस्थित भाविकांनी या सोहळ्याचे मनापासून कौतुक केले.
-संगमनेरातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव 
संगमनेरमध्ये आयोजित ‘वारकरी वाईब्स’ या भक्तिमय सांगीतिक सोहळ्याला संगमनेर तालुक्यातील कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.पारंपरिक वारकरी संस्कृती आणि आधुनिक संगीताची सांगड घालत सादर झालेल्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमातून संगमनेरच्या कलाकारांच्या सुप्त कलागुणांना मोठे व्यासपीठ मिळाले, 
     आमदार अमोल खताळ
       संगमनेर विधानसभा
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!