संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळचे भूमीपुत्र असलेले पत्रकार गोरक्षनाथ नेहे यांची व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संयोजक पदी निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परभणी येथे झालेल्या व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या परभणी येथे झालेल्या पदग्रहण सोहळ्यात त्यांना व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार विशाल पाटील आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे
राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया विभागीय प्रदेशाध्यक्ष अजित कुंकलोळ,नरेंद्र देशमुख आणि संचालक गोरक्षनाथ मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पत्रकार नेहे यांनी गेली दोन दशकापासून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न विविध नामांकित दैनिकांच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडणे पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करणे,पत्रकारिता क्षेत्रातील नव्या पिढीला प्रोत्साहन देणे तसेच राज्यभर संघटनेचे कार्य अधिक सक्षम करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा सचिव नवनाथ वावरे भारत रेघाटे इदरीस शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
गोरक्षनाथ नेहे यांच्या निवडीबद्दल संगमनेरसह अहिल्यानगर या जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
-पत्रकारांच्या एकजुटीसाठी सदैव प्रयत्नशील राहू-पत्रकार गोरक्ष नेहे
व्हॉईस ऑफ मीडिया’ने माझ्यावर राज्य संयोजकपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.राज्यातील पत्रकारांच्या समस्या, त्यांचे प्रश्न हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. पत्रकारांची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठीही प्रयत्नशील राहू,”असे नवनियुक्त राज्य संयोजक गोरक्षनाथ नेहे यांनी सांगितले.
