नाशिक दिनकर गायकवाड राज्यमंत्री नामदार नरहरी झिरवळ आदिवासी समाज हितार्थ ते विधानसभा उपाध्यक्ष पदावर असताना पासून प्रत्येक वर्षी ९ ऑगस्ट जागतिक मुळ निवासी दिन साजरा करायला सुरवात झाली आणि नुकतेच मुंबईत मुळ निवासी दिनाचे औचित्य साधून वनरंग मोहत्सव साजरा झाला.
महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत जागतिक मुळनिवासी दिनाला राजश्रय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नामदार झिरवाळांनी केला.स्व.मधुकर पिचड आदिवासी विकास मंत्री असताना पहिल्यांदा आदिवासी विकास विभागाने जागतिक मुळनिवासी दिन साजरा केला.
आदिवासी समाज हितार्थ प्रामाणिक पणे मधुकर पिचड ना.नरहरी झिरवळ वाटचाल व लढा सुरू आहे.पार्टी पक्षाच्या किती अहारी जावा याचा विचार राजकीय नेतृत्वाने करायला हवा आदिवासी समाज हितार्थ संपूर्ण आदिवासी समाज ९ ऑगस्टला जागतिक मुळनिवासी दिनाला संघटित होत असेल तर त्यात काय वाईट आहे.
भारतीय जनता पार्टी पक्षला आदिवासी समाजाला आदिवासी, मुळनिवासी ही ओळख समाजाला द्यायची नाही.त्यामुळे त्यांनी पहिल्या पासून ९ ऑगस्ट जागतिक मुळनिवासी दिनाला विरोध हा केला आहे. आजच्या सरकार मधील आदिवासी विकास मंत्री जागतिक मुळनिवासी दिनाला आदिवासी समाजाला हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा पुढे येत नाही की शासकीय पातळीवर जागतिक मुळनिवासी दिन ही साजरा करत नाही.
त्यांच्याकडून आदिवासी हीत जपले जाईल ही अपेक्षा न केलेली बरी असे कैलास शार्दुल यांनी सोशल मीडियातून सांगितले.नामदार झिरवळ यांनी मुबंई मध्ये जागतिक मुळनिवासी दिन साजरा करुन सातत्य जपले आहे.
त्याचाच भाग म्हणून नुकतेच ७ ऑगस्टला मुंबईत स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह मंत्रालय येथे वनरंग महोत्सव सुरू झाला.या महोत्सवाच उदघाटन राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री नामदार सुनेत्रा पवार यांनी केले.
जागतिक मुळ निवासी दिनाला राजाश्रय मिळवून देण्याच्या नामदार झिरवळांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आपला ही खारीचा वाटा असावा या हेतूने या वनरंग महोत्सवात आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना नाशिक जिल्हा या संघटनेचा नूतन पदाधिकारी वर्गास नियुक्ती पत्र देऊन पदग्रहण समारंभ घेत आहे याच कार्यक्रमात आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना नाशिक जिल्हा या संघटनेने मागील पंचवीस वर्षापासून पाहिलेले स्वप्न आदयक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यावर आधारित चित्र चित्रपटाचे पोस्टर तसेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत आहोत.अशी माहिती कोळी महादेव समाज विकास संघटनेचे संस्थापक कैलास शार्दुल यांनी दिली
