पत्नी मनीषा रजपूत यांची चौकशीची मागणी
झरेकाठी सोमनाथ डोळे राहता तालुक्यातील केलवड येथील आकाश दशरथ रजपूत (वय २३) हा तरुण केलवड गावातील एका ट्रक बरोबर मदतनीस चालक म्हणून गेला असताना त्याचा उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर, यल्लापूर तालुक्यातील मोलेपाल अर्बैल घाट परिसरात नुकताच रात्री ८ पासून ते १३ ऑगस्टच्या सकाळी ८,४५ पर्यंत झालेल्या खुनाची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी यल्लापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ आणि २३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.घडलेल्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की यल्लापूर पोलीस ठाण्यात तक्रारदार रवी कृष्ण सिद्दी, रा. कोडलागड्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद झाला.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजशेखर वंदाली यांनी भेट देऊन पंचनामा केला.या खुनातील मयताची ओळख पटली आहे.मयताचे नाव आकाश दशरथ रजपूत असून तो मुळचा केलवड ता. राहता,येथील रहिवासी आहे.
आकाश हा केलवड गावातील एका ट्रकवर मदतनीस चालक म्हणून दुसऱ्या चालकासोबत कामानिमित्त गेला होता प्रवासाच्या दरम्यान त्यांचा मृतदेह यल्लापूरच्या अर्बैल घाट येथे संशयास्पद गंभीर शरिरावर जखमा असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने राहता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ मयत आकाश यांची पत्नी सौ.मनीषा आकाश रजपूत आणि केलवड गावातील नागरिकांनी न्यायासाठी आवाज उठवला आहे. मनीषा रजपूत यांनी १५ ऑगस्ट रोजी तहसीलदार, राहता यांना लेखी निवेदन दिले आहे त्यात माझा पती आकाश यांचा बाहेरील राज्यात संशयास्पद मृत्यू झाला असल्याने त्याचा खुन झाला असून प्रकरणाची निपक्षपाती आणि सखोल चौकशी करावी.
आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी मयताचे कुटंब गरिब असल्याने शासनाकडून तातडीची आर्थिक मदत आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी.तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया केली जाईल तसेच शासकीय मदत दिली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
सध्या यल्लापूर पोलीस या खुनाचा अधिक तपास करत आहेत.ट्रक चालकासोबत गेलेल्या दुसऱ्या व्यक्तीचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे मनीषा रजपूत यांनी सांगितले.रस्ता रोको आंदोलन प्रंसगी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे पोलीस कर्मचारी संदीप उंदावत व पोलीसच पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता
स्थानिक नेत्यांनी व प्रशासनाने मध्यस्थी करत या प्रकरणाचा पाठपुरावा पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे करण्याची आश्वासन दिले आहे .तसेच तहसीलदारांमार्फत कुटुंबाला सर्व शासकीय मदत मिळवून देण्याची पत्र देण्यात आले आहे मात्र येथे पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र व लाखोंच्या उपस्थितीत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा .
एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांनी दिला आहे
