लोणी जिल्हा परिषद शाळा संकुल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

Cityline Media
0


  लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले,मुली व उर्दु येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ८० वा.स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात पार पडला.
जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या मा.अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पा.यांचे हस्ते सकाळी ध्वजारोहण झाले. सौ.विखे यांचे हस्ते विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.सौ.शालिनी विखेपाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रत्येकाने देशासाठी आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणा-या पूर्वजांचे  स्मरण कायम स्वरुपी लक्षात ठेवावे,व देश प्रगतीसाठी आवश्यक असणा-या गोष्टी करण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
प्रसंगी संगीत कवायत, बक्षीस वितरण,मुलांची भाषणे,खाऊ वाटप करण्यात आले. शिक्षक.रमेश वैद्य प्रवीण कपाटे, बाळासाहेब उगले यांचेकडून मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.वि.विखे पा.सह.साखर कारखान्याचे संचालक संजय सोपान आहेर यांनी भूषविले.

या कार्यक्रमासाठी सरपंच श्रीम.कल्पना मैड पं.स.सदस्य.संतोष ब्राह्मणे, केंद्रप्रमुख विठ्ठल रंधे,अशोक बिडवे,सी.एम.विखे,अशोक कोरडे, बाळासाहेब चव्हाण, शा.व्यवस्थापन.समितीचे अध्यक्ष मोहन आहेर,सौ.ज्योती विखे,ग्रामपंचायत सदस्या सौ.सिंधु म्हस्के,सौ.सुनिता चव्हाण .रंगनाथ खेमनर इ.उपस्थित होते.

याप्रसंगी माजी विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी,शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानदेव कोकणे  व सौ.सुनिता थोरात  यांनी केले. तर श्रीम.रेश्मा वाजे यांनी आभार प्रदर्शन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!