आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून विकासकामाला प्रारंभ;माजी सैनिकांसह ग्रामस्थांची उपस्थिती
संगमनेर संपत भोसले तालुक्यातील रायतेवाडी येथे गावांतर्गत संतोष बाळासाहेब शिंदे वस्ती पर्यंतच्या रस्ता खडीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असून,या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच माजी सैनिक लष्कर सैनिक बादशहा राहाणे, लष्कर सैनिक प्रदीप यादव, लष्कर सैनिक मिलिंद मंडलिक,लष्कर सैनिक सोपान मंडलिक, लष्कर सैनिक सोपान कोटकर यांच्या हस्ते पार पडला.
या रस्त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून,पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम मार्गी लागल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
रायतेवाडी परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी गावांतर्गत रस्त्यांचा मोठा आधार आहे. मात्र,काही भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः वस्ती भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे चिखल,खड्डे आणि वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत होत्या.या पार्श्वभूमीवर संतोष बाळासाहेब शिंदे वस्तीपर्यंतचा रस्ता खडीकरण करून अधिक सुकर करण्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या कामामुळे रायतेवाडी गावातील नागरिकांना तसेच वस्तीवरील कुटुंबांना ये-जा करण्यासाठी अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालया कडे होणारी ये-जा, दैनंदिन बाजारपेठेतील व्यवहार तसेच अत्यंत आवश्यक सेवांसाठी या रस्त्याचा मोठा उपयोग होणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माजी सैनिक, रायतेवाडी ग्रामस्थ तसेच भाजप शिवसेना महायुतीच्या पदाधिकारी,ग्रामस्थ, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ते, पाणी, वीज आणि मूलभूत सुविधांचा विकास हा ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
गावातील अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेणे सुलभ होते, विद्यार्थ्यांची वाहतूक अधिक सुरक्षित होते आणि नागरिकांना दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होतात. असे मत महेश मांडेकर यांनी व्यक्त केले.
रायतेवाडी येथे मंजूर झालेल्या या १० लाख रुपयांच्या रस्ता खडीकरणाच्या कामामुळे संबंधित वस्तीतील नागरिकांची अनेक दिवसांची रस्त्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या विकासकामाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत असून, काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे,अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रसंगी भारतीय जनता पार्टी संगमनेर तालुका सरचिटणीस महेश मांडेकर,शॅम्प्रो संचालक तान्हाजी आहेर,ज्येष्ठ कार्यकर्ते गोरख आहेर, ह.भ.प.बाळासाहेब आहेर,अरुण मांडेकर, अभिमन्यू मंडलिक, सुनील आहेर, दीपक बांगर, पप्पू शिंदे, संतोष शिंदे, ईश्वर मांडेकर, जनार्दन डाके, रेवण मंडलिक, गोरक्ष मंडलिक, निखिल शिंदे,नारायण बांगर, रमेश मांडेकर,दिलीप मांडेकर, निलेश राहणे, किसन बांगर, अविनाश मांडेकर, संदीप मांडेकर,सागर शिंदे, रमेश पठाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून निधी उपलब्ध झाल्याने रायतेवाडीच्या विकासाला आणखी एक महत्त्वाची जोड मिळाली असून, आगामी काळात गावातील इतरही प्रलंबित विकासकामांना गती मिळावी,अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
