झरेकाठी सोमनाथ डोळे राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील श्री.छत्रपती शिवाजी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक के.बी.बारगुजे व मा.सैनिक अनिल सूर्यभान घोलप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी असाक्षर मुक्त गावाची शपथ घेण्यात आली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत-संगीतावर आधारित आकर्षक कवायत सादर केली. शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची तसेच महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू आदी स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांची सजविलेल्या ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढण्यात आली. प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीचा संदेश दिला.पाथरे जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शण कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी बारावी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी साई ज्ञानदेव पावडे याचा आदर्श विद्यार्थी म्हणून गौरव, करण्यात आला व पाथरे गावचे सरपंच . उमेश घोलप यांच्या व अनेक बक्षीस दात्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गावातील विविध दानशूर देणगीदार यांच्या वतीने रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
सन २००१ मधील इयत्ता चौथीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन त्यांच्या यशाचे कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून शाळेशी असलेले त्यांचे ऋणानुबंध आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच उमेश घोलप पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर , विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ,बक्षिसांचे देणगीदार व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
