झरेकाठी सोमनाथ डोळे स्वातंत्र्यदिनी सलग सुट्टी जोडून आलेल्या शासकीय सुट्ट्यामुळे १५ ऑगस्ट शनिवारी भंडारदरा येथे अनेकांनी गर्दी होण्याची शक्यता आहे पर्यटकांची पंढरी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटक भटकंती करण्यासाठी येत असल्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आहे.
१५ ऑगस्टच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा धरण,रंधा धबधबा, कोकणकडा,हरिश्चंद्र गड,कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदीर रतनवाडी,या प्रेक्षणीय स्थळी पुणे,नाशिक, ठाणे मुंबई आणि नगर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.
जोडून सुट्टी आल्याने १५ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान या प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची दाट शक्यता व्यक्त होतेय.त्याचप्रमाणे सध्या पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत.या भागातील रस्ते अरुंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होवुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता वाहतुक नियमात बदल करण्यात आले आहेत.
जिल्हयाचे पोलीस अधीक्षक मुमाकां सुदर्शन यांनी तसे आदेश दिले आहेत.
यानुसार रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. शेंडी / भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा,वारंघुशी फाटा येथुन प्रवेश असेल.
एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा वाकी फाटा - चिचोंडी फाटा यश रिसोर्ट शेंडी भंडारदरा धरण स्पिल्वे गेट भंडारदरा --गाव- गुहीरे रंधा मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.यातून फक्त अत्यावश्यक सेवा ॲम्बुलन्स अग्निशामक दल शासकीय वाहने याना वगळण्यात आले आहे पर्यटकांनी गर्दी बघता नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असुन वाहनांची देखील तपासणी होणार असल्याने मद्यपान करणे किंवा मद्य बाळगू नये असे आवाहन राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक किशोर पवार यांनी केले आहे.
