आमदार अमोल खताळ;वडगावपान येथील सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता
संगमनेर प्रतिनिधी अखंड हरिनाम सप्ताह आणि संतांच्या विचारांच्या माध्यमातून मनाला एक वेगळी ऊर्जा मिळते.ही ऊर्जा घेऊन आपण जीवनात पुढे जात असतो.हीच आध्यात्मिक ऊर्जा आयुष्याला दिशा देणारी ठरते,असे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.
तालुक्यातील वडगावपान येथील साईनगर मध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे मठाधिपती उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर वडगावपानचेसरपंच श्रीनाथ थोरात ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद सुधाकर काशीद राहुल काशीद समीर मोरे सतीश थोरात मधुकर थोरात यांच्यासह साई ग्रुप वडगाव पान चे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढं बोलताना म्हणाले,की मागील वर्षी या सप्ताहाला उपस्थित राहण्याचा योग आला होता.या सप्ताहाच्या माध्यमातून मिळणारा आनंद आणि सकारात्मक ही ऊर्जा मनाला नवी उभारी देणारी आहे. आजच्या काळात तरुण पिढीकडून कळत-नकळत काही चुका होत आहेत. अनेक धार्मिक उत्सवांचे स्वरूपही बदलत चालले आहे. मात्र, साई निर्माण ग्रुपसारख्या संस्था धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवत आहेत.त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
मागील वर्षी पंढरपूरला गेल्यानंतर अनेक दिंड्यांचे दर्शन झाले. यंदाही वारी दरम्यान तब्बल ११ किलोमीटर चाललो मात्र चालताना अजिबात थकवा जाणवला नाही.माणूस सतत चालत राहतो, हीच खरी वारकरी संप्रदायाची व अध्यात्माची ताकद आहे.प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा. त्यातून मिळणारा आनंद खरोखरच वेगळा असतो. संत-महंतांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची भूमी समृद्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक संतमहंतांच्या विचारांचा वसंस्कारांचा समाजावर मोठा प्रभाव आहे. आज आपण सुरक्षित वातावरणात आणि मोकळा श्वास घेत जगत आहोत, त्यामागे संत-महंतांचे मोठे योगदान असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
-धर्म-अध्यात्माच्या कार्यासाठी कटिबद्ध
धर्म व अध्यात्माच्या कार्यासाठी आपण कटिबद्ध असून आतापर्यंत गावागावांतील सभामंडप, मंदिरांसमोरील सभामंडप तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी निधी दिला आहे. त्याचबरोबर गावांमध्ये रस्ते झाले पाहिजेत आणि ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो सोडविला पाहिजे, यासाठीही आपण प्रयत्नशील आहोत. अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे दीड-दोन वर्षांत अनेक कामे करता आली. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात काम करायचे आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.”
आमदार अमोल खताळ, संगमनेर विधानसभा
