आंदोलनाचा इशारा देतात कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Cityline Media
0

 देवळालीच्या  शेतकऱ्यांकडून पेढे वाटून आनंद साजरा.!

देवळाली प्रवरा प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देताच देवळाली प्रवरा येथील शेतकऱ्यांचे जवळपास सहा कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा झाल्याने राहुरी तालुक्यातील देवळालीच्या शेतकऱ्यांकडून देवळाली प्रवरा बाजार तळावरील शेतकरी पुतळ्यासमोर पेढे वाटून आनंद साजरा केला.
प्रसंगी सोसायटीचे माजी अध्यक्ष नानासाहेब पठारे,माजी उपाध्यक्ष उत्तम कडू, माजी संचालक शिवाजी मुसमाडे,  काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा डॉ. तनपूरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, अरुण ढूस, प्रहारचे आप्पासाहेब ढूस, माजी संचालक नानासाहेब कदम, दीपक पठारे, देवराम कडू, रावसाहेब वरखडे, सुभाष होले, राहुल महांकाळ, कैलास चव्हाण, सुभाष वाकळे, आप्पासाहेब उऱ्हे ,अभिजित कदम, आबा राजळे, मनोज संसारे,अन्सार पठाण, सिराज भाई, शाकीर तांबोळी,मुनीर बागवान आदी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

देवळाली प्रवरा हद्दीतील शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम परत गेल्याच्या बातमीने येथील शेतकरी हवालदिल झाले होते.  महाविकास आघाडीच्या सदस्यांनी देवळाली प्रवरा सोसायटीत जाऊन सोसायटी व्यवस्थापनाकडून माहिती घेतली असता  सोसायटीच्या व्यवस्थापनाने जुजबी उत्तर देऊन हात झटकले होते. त्यामुळे झालेली चूक सुधारून आठ दिवसात कर्जमाफीची परत गेलेली सहा कोटी ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा, महाविकास आघाडीच्या वतीने देवळाली प्रवरा सोसायटी व शासनाचे विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता.

या आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासन खडबडून जागे झाले..वरिष्ठ पातळीवर सूत्रे हालली.. आणि अखेर आज शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली. त्याबद्दल देवळाली प्रवरा येथील कर्जदार शेतकऱ्यांनी  शेतकरी पुतळ्यासमोर पेढे वाटून आनंद साजरा केला व देवळाली प्रवरा येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच जिल्हा सहकारी बँक व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!