नाशिक दिनकर गायकवाड कॉक्रोच जनता पार्टीच्या महाराष्ट्र दौऱ्याअंतर्गत नाशिक जिल्हा बैठक शासकीय विश्रामगृह मधील गार्डन मध्ये संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत नुकतीच पार पडली.
बैठकीत मुख्य मुद्दे म्हणून स्कुल ठीक करो अभियान अंतर्गत सर्व सरकारी शाळांचे ऑडीट कसे करावे, सीजेपीच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया आणि संघटनात्मक बांधणी याबाबत चर्चा झाली.
या बैठकीस पक्षाचे संस्था सहसचिव अक्षय शिंदे, पश्चिम क्षेत्र समन्वयक ॲड.जयसिंग शेरे, डॉ.नितीन दिघे,सम्राट सोनावणे,क्षितिज पगार, प्रज्वल कसबे,प्रवीण गांगुर्डे,सागर स्वामी,धवल,ॲड.अभिजित गोसावी,ॲड.रेखा धुळधूळे,तेजल गवारे, कार्तिकेश बोरसे आणि माजी सनदी अधिकारी बी.जी.वाघ तसेच नाशिकचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाने बैठकीत संघटनात्मक कामकाज मजबूत करण्यावर भर दिला असून आगामी काळात नाशिक जिल्ह्यात अधिक सक्रियता दाखविण्याचे नियोजन केले असल्याचे डॉ.प्रविण गांगुर्डे यांनी सांगितले.
