स्वराज्य संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदग्रहण सोहळा उत्साहात

Cityline Media
0
पुणे रुपाली भालेराव पुणे जिल्ह्यातील अवसरी येथील विघ्नहर मंगल कार्यालयात स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या नुतन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदग्रहण सोहळा अगदी आनंदी वातावरणात पार पडला.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात उपस्थित होत्या.
प्रारंभी दिप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच नुतन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संदिप वाघमारे,मंतोष मिश्रा,चंदकांत वेदपाठक, राजेंद्र रघोजी,रमेश माहुरे,सौ. दिक्षा माने,सौ.शिल्पा म्हमाणे, सौ.सिंधू राठोड ह्या सर्वांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र तसेच शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी संचालक तथा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव,उत्तर महाराष्ट्र सचिव शरदभाऊ परदेशी कोकण विभाग संघटक शर्मिला म्हात्रे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अलिम शेख, अहिल्यानगर महिला जिल्हाध्यक्षा कल्पना कोळसे ठाणे जिल्हाध्यक्ष अजय म्हात्रे अहिल्यानगर जिल्हा सचिव पुजा काकडे अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष शकंर कवाणे उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकारी यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजु भोर यांनी त्यांचे मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले तसेच प्रमोद हिंगे यांनी उत्तम असे सुत्रसंचालन केले तर पुणे जिल्हा पत्रकार अध्यक्ष मिलिंद टेमकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा कार्यकारिणी मधील देविदास हिंगे, राहुल ढोबळे,जयवंत मेंगडे, रघुनाथ ढोबळे, आनंद हिंगे,रमेश थोरात,दिपक घनवट, राजेंद्र भोर,श्रीधर भोर, राजेंद्र लबडे,अरूण काटे, जितेश शिरसाठ, शिवदत्त जगताप, संतोष कडूसकर,ॲड दिपक लोहाटे,आंबेगाव तालुका महिला अध्यक्षा वैशाली भोर, मनिषा वायळ, सायली वायाळ, स्नेहल कराळे आदींनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!