कोकणगाव- शिवापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Cityline Media
0
संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील कोकणगाव-शिवापूर येथे साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती लहू गर्जना तरुण मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे मार्गदर्शक तथा अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा सरचिटणीस रामनाथ गायकवाड यांनी केले होते.कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून करण्यात आली. यावेळी कोकणगाव-शिवापूर गावातील शेकडो अण्णाभाऊ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंचावर नाशिक पदवीधर मतदार संघाचे मा. आमदार डॉ. सुधीर तांबे,अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी.अ.जा.विभाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव, मा.जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, मातंग समाजाचे नेते मंजाबापू साळवे, सरपंच सौ.आशा जोंधळे,उपसरपंच राधिका पवार,मा. सरपंच मंगल जोंधळे,मातंग एकता अंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शशिकांत थोरात,संगमनेर शहर काँग्रेस अध्यक्ष सोनू गायकवाड,पै.विकास जाधव, ग्रामपंचायत सदस्य कैलास पवार,शिवाजी जोधळे,देविदास गायकवाड,वंचितचे रविभाऊ पवार,हौशीराम पारधी, बाबासाहेब साळवे,संपत राक्षे,नंदू शिंदे,रवी शिंदे,संजना पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.सुधीर तांबे म्हणाले, "अण्णाभाऊ साठे हे फक्त साहित्यिक नव्हते,तर ते एका वंचित समाजाचा आवाज होते. 'जग बदल घालूनी घाव, सांगूनी गेले मला भीमराव' हे वाक्य सांगून त्यांनी शिक्षण हेच परिवर्तनाचं हत्यार आहे हे सांगितलं.आज त्यांच्या विचारांची खरी गरज आहे.अण्णाभाऊंनी ३५ कादंबऱ्या, १३ कथासंग्रह लिहिले पण त्यांचा प्रत्येक शब्द हा गोरगरिबांच्या हक्कासाठी होता. त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे फक्त हार घालणे नाही तर त्यांचे विचार घराघरात पोहोचवणे आहे."

जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांनी आपल्या भाषणात सांगितले, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. काँग्रेस पक्षाने नेहमीच फुले-शाहू-आंबेडकर आणि अण्णाभाऊंच्या विचारांना ताकद दिली आहे.आज कोकणगाव-शिवापूरचया या मातीतून आम्ही शपथ घेतो की, अण्णाभाऊंनी दाखवलेल्या सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या मार्गावर आम्ही चालत राहू. रामनाथ गायकवाड यांनी अतिशय सुंदर नियोजन करून ही जयंती उत्सव म्हणून साजरी केली,त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले,यापुढेही जिल्ह्यात प्रत्येक गावात अण्णाभाऊंची जयंती याच ताकदीने साजरी केली जाईल असे सांगण्यात आले.

यावेळी मंजाबापू साळवे,संतोष गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर राक्षे यांनी केले.

सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत बहार म्युझिकल ऑर्केस्ट्राचे प्रमुख राधाकिसन गायकवाड यांनी केले, तर सर्वांचे आभार जयंती उत्सवाचे आयोजक रामनाथ गायकवाड यांनी मानले.

कार्यक्रमानंतर उपस्थित बंधू-भगिनींसाठी वसंत बहार ऑर्केस्ट्राच्या वतीने मनोरंजनाचा भव्य कार्यक्रम सादर करण्यात आला.
यावेळी जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी
 श्रावण गायकवाड, आदित्य गायकवाड, देविदास गायकवाड, गणेश उमाप,अजय आव्हाड,गणेश गायकवाड,प्रतीक गायकवाड,ओम गायकवाड,ईश्वर भडकवाड आदींनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!