नाशिक दिनकर गायकवाड येथील वकील अधिष्ठान विचार मंच, आयोजित नाशिक येथे शिवशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड.अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचशील सभागृह, शालिमार,नाशिक येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ॲड.रवि नारायण कांबळे असणार आहेत.अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,ओबीसी व अल्पसंख्याक समाजाच्या विविध सामाजिक प्रश्नांवर परिसंवादात चर्चा होणार आहे.
