पतीचा खून करणाऱ्या महिला आरोपीसह चौघे जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशकात नुकतीच समोर आली आहे.
नाशिक पोलीस गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत महिला आरोपीसह चौघांना ताब्यात घेतले आहे.स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा,नाशिक येथील रहिवासी गोरखनाथ सातपुते (वय ४०) हे अचानक गायब झाल्याने त्यांच्या अपहरणाचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना, गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त खबऱ्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता,मृत गोरखनाथ सातपुते यांची पत्नी हसीना आणि तिचा प्रियकर साहिल शहा यांच्यातील प्रेमसंबंधात गोरखनाथ अडथळा ठरत होते.त्यामुळे दिनांक ०६ ऑगस्ट रोजी साहिल शहा व त्याच्या साथीदारांच्या मदतीने चाकूने गळा चिरून गोरखनाथ यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!