लोहारे-कासारे पाझर तलावातून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी सोडले.

Cityline Media
0
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आमदार खताळांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना 

संगमनेर संपत भोसले संगमनेर तालुक्यातील लोहारे-कासारे येथील पाझर तलावातील पाणी खरीप हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी तसेच परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आले आहे.आमदार अमोल खताळ यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत पाणी सोडण्याची कार्यवाही करून घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी सोडण्यात आल्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार खताळांची कृतज्ञता व्यक्त केली.
खरीप हंगामातील पिकांना सध्या पाण्याची गरज असून,  परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असल्याने लोहारे -कासारे परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे पाझर तलावातील पाणी  सोडण्याची मागणी केली होती.या शेतकऱ्यांच्या मागणीची आमदार खताळ यांनी तातडीने दखल घेत.लघु पाटबंधारे विभागाच्या  अधिकाऱ्यांना पाझर तलावातील पाणी तातडीने सोडण्या बाबतच्या सूचना दिल्या.त्यानुसार तलावातील पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खरीप पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरजही भागण्यास हातभार लागणार आहे.

पाझर तलावाचे पाणी सोडण्यात आल्याने लोहारे-कासारे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले.

-आश्वासन नव्हे पाठपुराव्याने विकास शक्य.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात केवळ आश्वासन न देता प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे असते. लोहारे- कासारे येथील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन तातडीने पाझर तलावातून पाणी सोडण्यात आल्याने खरीप पिकांना मोठा आधार मिळाला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!