श्रीरामपूर दिपक कदम शहरात भारतीय लहुजी सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी करण्यात आली.
प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी श्रीरामपूरचे मा.आमदार भाऊसाहेब कांबळे,भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफ शेख
जिल्हाप्रमुख रज्जाक शेख,ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बोरसे, हाजी गफार पोपटिया, राजेंद्र त्रिभुवन, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख रईस शेख,शिवस्वराज्य संघटनाचे सलमान पठाण,सामाजिक कार्यकर्ते विजय खाजेकर, ॲड.रमेश कोळेकर,सिकंदर तांबोळी
हरून तांबोळी ,रमिज पोपटिया, शुभम बागुल,नागेश साठे, नितीन क्षीरसागर, सागर चापानेरकर, रमजान शेख,अब्दुल शेख, बाळासाहेब मोरे, जावेद शेख,संजय कुमार वाहुळ, गोरख शिवदे, संदीप शेडगे, विशाल मोजे, सत्तार महबूब पठाण,हाजी फैयाज बागवान,श्याम शेळके,अशोक जगधळे, सल्लाउदीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून वंचित,कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या विचारांचे स्मरण करून उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले.
१ ऑगस्ट रोजी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी जेणेकरून सर्व नागरिकांना जयंती साजरी करता येईल ही मागणी भारतीय लहुजी सेनाचे राष्ट्रीय सचिव हनीफ पठाण यांनी यावेळी केली.
