डि पॉल पब्लिक स्कूलमध्ये ग्रीन डे उत्साहात

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम शहरातील डी पॉल पब्लिक स्कूल मध्ये ग्रीन डे निमित्ताने विविध वृक्षाचे रोपण करण्यात आले.यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता पहिली या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
प्रसंगी वृक्षारोपण करणे किती महत्वाचे आहे,झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला.यानंतर शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅथ्यू , उपमुख्याध्यापक सिस्टर पावना,सिस्टर जेनी ,सिस्टर जेन्सी व विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगणात लिब, साग,बदाम,अशोक,आंबा,गुलाब व इतर झाडाचे रोपण केले.या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक ज्योती जाधव,सोनम ,स्मिता कांबळे,दिपाली अशोक पवार आशिष अमोलिक,आदी शिक्षकाचे सहकार्य लाभले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!