ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला आहे त्या समाजाचा उद्धार करणे काळाची गरज आहे जे लोक जाणतात ते लोक धन्य होय हे वाक्य माझे नसून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे.निश्चितच त्यांच्या या वाक्याची आज मला आठवण झाली ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला त्याचाच उद्धार आपल्याला करावा लागतो, भलत्याच लोकांच्या मागे लागलो तर माझी व माझ्या समाजाची अधोगती आहे हे मला आज रोजी कळालेले आहे.
आज कितीही मोठा डॉ. बाबासाहेबांचा अनुयायी असला तरी त्याच्या मध्ये जात आडवी येतेच हे मला काही दिवसांमध्ये कळालेले आहे.मी अशा वेड्या लोकांचा नाद करायलाच नको होता परंतु त्यामुळे मी त्या लोकांसोबत राहिलो तर मी वेडा बनणार आहे आणि ही सत्य परिस्थिती मला काही लोकांनी सांगितलं हे त्या लोकांचे नाव व त्या धर्माचे नाव सुद्धा घेऊ इच्छित नाही.
त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये पुन्हा एकदा माझ्यावर कोणत्याही प्रकारचा लांचनाचा प्रयोग आपण करू नये .त्याबाबत अगोदरच मी आपली क्षमा मागतो.एका ठिकाणी विश्वाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध म्हणतात की जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर वेड्या लोकांची संगती सोडा.
परंतु मला माहित नव्हतं की ते वेडे लोक खरंच वेडे असतील त्यामुळे आज व यानंतर मी अशा वेड्या लोकांची संगती सोडणार आहे. त्यांच्यापासून मला कोणतीही प्रेरणा मिळत नाही.माझे खरे गुरु मूलनिवासी बहुजन महामानव आहेत ज्यांनी मला खरा मार्ग दाखवला याबाबत शंका नाही.
परंतु ज्या समाजामध्ये तुमचा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणे काळाची गरज आहे जे लोक जाणतात ते लोक धन्य होय हे वाक्य माझ्या कानावर आणि डोळ्याच्या समोर येऊ शकत प्रथमतःयेऊ शकत नाही कारण हे वाक्य सांगण्यासाठी अगोदर मला माझ्या महामानवाचा विचार करावा लागेल.
माझे मूलनिवासी महामानव म्हणजे शिवशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे हे होय.कारण त्यांनीच आम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगितले नसते तर मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जास्त पुस्तके घेतलीच नसती.
परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जसे मला प्यारे आहेत तसे इतर महामानव सुद्धा आम्हाला जवळचे आहे व महत्त्वाचे वाटतात. आम्ही त्यांचा विचार त्याग करून पुढे कोणतेही परिस्थितीमध्ये जाऊ शकत नाही किंवा प्रगती करू शकत नाही .कारण या भारत देशामध्ये युरेशियन ब्राह्मणांनी जातीचा गर्व वाढवलेला आहे.
जातीचाच नव्हे तर त्या जातीमध्ये इतर पोट जाती तयार करून त्यामध्ये सर्वात मोठा घात केलेला आहे.आज सामाजिक कार्य करत असताना हे लक्षात येते की आमच्या येणाऱ्या लोकांचा मार्गामध्ये न जाता आम्ही वेगळा मार्ग शोधला पाहिजे आणि आम्ही वेगळा मार्ग शोधला नाही तर आमची प्रगती होत नाही.
तसेच आमची प्रगती ही अधोगतीकडे जाण्याचे जास्त शक्यता वाटते. गेल्या काही काळामध्ये मला असं वाटले की मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा अनुयायी आहे.परंतु त्यामध्येही काहीतरी अडथळे येत असतात आणि ते अडथळे दूर करण्यासाठी मला वेगळा मार्ग शोधावाच लागेल.
आज आमच्या मूलनिवासी बहुजन बांधवांची फार दयनीय अवस्था झालेली आहे. त्याचे कारण म्हणजे आम्ही आमच्या मूलनिवासी बहुजन महामानवाला ओळखले नाही. बहुजनहो आपण ओळखले जर असते तर आज पर्यंत आमच्या भारत देशाची फार मोठी प्रगती झाली असती.
आम्ही ज्यांच्या जोखडात अडकतो तो विचारानेच नव्हे तर डीएनए ने सुद्धा विदेशी आहे.अशा लोकांच्या जोखडात आमचे मूलनिवासी बहुजन बांधव अडकले आहेत. त्यांचा नाद वेळीच न सोडल्यास आमच्या मुलानिवासी बहुजन बांधवांचा नाश निश्चित होणार आहे.
कारण त्यांचा माईंड ६७४३ जातीच्या पलीकडे जाऊन पोट जाती पलीकडे जाते तर त्याचा ६७४३ पेक्षा जास्त आयक्यू लेव्हल असल्याचे वाटते व इतक्या पेक्षा जास्त टक्क्याचा ज्यांचा आयक्यू लेव्हल आमच्या मूलनिवासी बहुजन बांधवां पेक्षा जास्त आहे यात शंका नाही.
त्यांनी आमच्या मध्ये जातीय मानसिकता निर्माण करून आज जे लोक मला विरोध करत आहेत ते लोक माझे कधीही शत्रू नव्हते व नाही.परंतु ही मानसिकता त्यांच्या डोक्यामध्ये टाकणारा विदेशी युरेशियन ब्राह्मण आहे हे मी आज तुम्हाला सांगतो आहे.येथे मी कोणत्याही ब्राह्मणाबद्दल बोलत नाही.
ब्राह्मण हा आमचा शत्रू नाही परंतु विदेशी असलेला युरेशियन ब्राह्मण हा आमचा खरा शत्रू आहे. त्यांना विदेशी म्हणावेच लागेल.उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे हे जातीने ब्राह्मणच आहे. परंतु ते येथील मूलनिवासी बहुजन महामानवांपैकी धर्मांतरित झालेले ब्राह्मण होय.
आज आम्ही त्यांचा विचार घेतोय त्यांच्या तत्वाप्रमाणे सुद्धा चालतोय परंतु युरेशियन ब्राह्मणाच्या तत्वाप्रमाणे नव्हे. माझ्या मूलनिवासी बहुजन बांधवांना आज आपल्याला खरा शत्रू कोण आहे.आमचा खरा शत्रू आम्ही ओळखला नाही त्यामुळे आम्ही मूलनिवासी बहुजन बांधव एकमेकांमध्ये भांडत असल्याचे मला दिसत आहे.
मित्रांनो आपण कधी हे पाहिले आहे का? आपण शत्रू सोबत राहून त्यांच्यावर वार करू शकतो नाही ,मुळीच नाही ही अशी परिस्थिती असताना सुद्धा आमचे दीड शहाणे लोक शहाण्यामध्ये दीड शहाणे मला सांगता अहो! तुम्ही काय बोलताय आम्ही युरेशियन ब्राह्मणा सोबत राहतो.
आम्ही युरेशियन ब्राह्मणा सोबत सुद्धा हे जातीय मानसिकतेची लढाई लढतोय.अरे! कधीही आपण पाहिले आहे का आजच्या घडीला युरेशियन ब्राह्मण हा तुमच्या जातीय मानसिकता नष्ट करण्यासाठी सहभाग घेतोय नाही मुळीच नाही.
कधी आम्ही हे पाहिले आहे का? आमचे मूलनिवासी बहुजन महामानव यांनी युरेशियन ब्राह्मणाच्या सभा घेतल्या.मला तरी कुठेही आठवत नाही. म्हणजे माझा आयक्यू लेव्हल चांगला आहे त्या दीड शहाण्या लोकांपेक्षा.मला काही लोकं राहुल पंडितयन यांचे उदाहरण देतात.
मी त्या लोकांना विचारू इच्छितो की त्यांनी फक्त सोप्या भाषेमध्ये लिखाण केलेले आहे.त्यांनी चुकीचा काही मांडले नाही.फक्त एवढेच गोष्ट आहे. त्यावर ते म्हणतात ते विदेशी आहेत मग आपण पुस्तके का त्याची वाचतोय?. इथपर्यंत आमच्या लोकांचा आयक्यू लेव्हल वाढला आहे.
मी त्या लोकांना म्हणतोय.तुम्ही ज्या मूलनिवासी महामानवाला मानता. त्या लोकांनी कधी युरेशियन ब्राह्मणाच्या सभा घेतल्या नाही. कारण की आमच्या मूलनिवासी बहुजन महामानवाला हे कळाले आहे की त्यांना म्हणजे युरेशियन ब्राम्हण यांना शिकवण्याची गरज नाही.
ते आपल्यापेक्षा जास्तच शिकलेले आहेत. म्हणजे आमचा लढा आम्ही ओळखला पाहिजे आमचा लढा आमच्या मुलनिवासी बहुजन बांधवा पर्यंतच नेला पाहिजे.आम्ही व आमचे दीड शहाणे माणसे आमचा लढा हा आमच्या बहुजन बांधवांपर्यंत नेण्यासाठी तयार नाहीत.आणि आम्ही अशा गोष्टी करायला चाललोय ज्या गोष्टी आम्हाला आमच्या मूलनिवासी महापुरुषांनी दिला नाहीत.
त्यांच्याविरुद्ध आम्ही आज आमची लढाई चालू ठेवली आहे.म्हणजे आम्ही आमच्या मूलनिवासी बहुजन महामानवा पेक्षा आमचा म्हणजे मूलनिवासी बहुजन बांधव हे आपला आयक्यू लेव्हल जास्त असल्याचे सांगतो, दाखवतो किंवा आपण स्वतःला सुद्धा समजतो.
मित्रांनो म्हणजे आपण आपल्या मूलनिवासी बहुजन महामानवाला विरोध करतोय. त्यांचे विचार घेत नाही. त्यांनी कुठेही "दलित" हा शब्द वापरला नाही. परंतु आमचे मूलनिवासी बहुजन बांधव स्वतःला दलित, दलित म्हणून दररोज हिणवून घेतात.जे वकील, डॉक्टर, इंजिनियर,आणि काही पूर्व न्यायाधीश सुद्धा आहेत ते सुद्धा त्यांच्या लेखांमध्ये दलित ,दलित हा शब्द वापरतात.
माझं शिक्षण त्यांच्यापेक्षा कमीच आहे.परंतु माझा आयक्यू लेव्हल मला तरी वाटतं त्यांच्यापेक्षा चांगला आहे. म्हणूनच मी माझ्या कोणत्याही लेखांमध्ये दलित हा शब्द वापरत नाही.दलित हा शब्द न वापरण्यासाठी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे निवडा आहे आहे.
तरी आम्ही दलित शब्द वापरतो आहे.मग आमच्या मूलनिवासी बहुजन समाज बांधवांचा आयक्यू लेव्हल बदल करण्यासाठी मी हा लेख लिहीत आहे. त्यामुळे मी ठराविक लोकांना उद्देशून म्हटले नाही.त्यामुळे मला चुकीने ही फोन करू नये अन्यथा मला काय करायचे कोठे जायचे आहे हे मला समजते .
कारण मी त्यांचा आयक्यू लेव्हल ओळखला आहे.मी त्याचा आयक्यू लेव्हल बदल करण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुद्धा जाणार आहे व त्याबाबतची तयारी सुद्धा मी केलेली आहे.त्यामुळे मला कोणीही कमी समजू नका.
शेवटी मी आपणास एक नम्र विनंती करतो की आमच्या मूलनिवासी बहुजन समाज बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की "" ज्या समाजामध्ये तुमचा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणे काळाची गरज आहे जे लोक जाणतात ते लोक धन्य होय.या उक्ती प्रमाणे आपण सर्व मूलनिवासी बहुजन बांधव यांनी वागल्यास येणाऱ्या काळामध्ये कोणताही आपल्या मूलनिवासी बहुजन बाधवास त्रास होणार नसल्याचे प्रथम भारतीय व शेवटी भारतीय या नात्याने लिहतोय .धन्यवाद.
ॲड रवि एन.कांबळे
उच्च न्यायालय
फोन नं.८२०८९६५७५९
