आश्वी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील
आश्वी खुर्द येथील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले,आदर्श कुंदुबवस्तल सेवाभावी जेष्ठ व्यक्तीमत्व देवराम कुंडलिक गायकवाड (वय ७५) यांचे नुकतेच हृृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आश्वी खुर्द परिसरात एक आदर्श संस्कारी कुटुंब प्रमुख व शिक्षित कुटुंब निर्माण करण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.
त्यांच्या पश्चात पत्नी तिन भाऊ भावजया दोन बहीणी मेव्हणे तिन मुले सुना,तिन नाती नात जावई , पाच पुतणे,चार पुतण्या नातवंडे असा मोठा परिवार आहे.आश्वी खुर्द येथील प्रवरातिरी शोकाकुल वातावरणात देवराम गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आश्वी खुर्द ग्रामपंचायतचे मा.उपसरपंच अनिल गायकवाड मुंबई स्थित पोलिस लष्कर सुभेदार सुनिल गायकवाड नानासाहेब गायकवाड यांचे ते वडील होत तर सुभाष गायकवाड बाळासाहेब गायकवाड सुरेश गायकवाड यांचे बंधु,पत्रकार संजय गायकवाड,महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे गणेश गायकवाड विजय गायकवाड सोमनाथ गायकवाड विनेप गायकवाड ऋषीकेश गायकवाड वैभव गायकवाड संदिप गायकवाड यांचे ते चुलते होत.
